प्राध्यापकांचा भरला प्रशिक्षण वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 05:18 PM2019-11-18T17:18:28+5:302019-11-18T17:18:54+5:30

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाच्यावतीने विविध विद्याशाखेतील प्राध्यापक संमंत्रकांसाठी प्र शिक्षण ...

 A training class filled with professors | प्राध्यापकांचा भरला प्रशिक्षण वर्ग

प्राध्यापकांचा भरला प्रशिक्षण वर्ग

Next

जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाच्यावतीने विविध विद्याशाखेतील प्राध्यापक संमंत्रकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम रविवारी पार पडला़
शैक्षणिक वर्ष २०१९ मध्ये जळगाव, धुळे व नंदूरबार तसेच महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील इतर जिल्ह्यांतून पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना शिक्षणक्रमांतर्गत प्रवेश देण्यापासून ते अंतिम निकालापर्यंतच्या विविध प्रक्रियांची माहिती करुन देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विभागाचे संचालक प्रा.ए.बी.चौधरी , प्रा.एस.टी.बेंद्रे, प्रिन्सिपल इन्वेस्टिगेटर सिलेज (सीएडीपी) हे उपस्थित होते. प्रा. चौधरी यांनी विभागाच्या कार्यपध्दतीची माहिती देतांना विद्यार्थी संख्या वाढीच्या दृष्टीने तसेच गुणवत्तापूर्वक शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी विभागाद्वारे राबविण्यात येणारे नवनवीन उपक्रम व केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबत माहिती देऊन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विशद केली. प्रशिक्षण कार्यक्रमास ५५ प्राध्यापक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागाचे संचालक प्रा.ए.बी.चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार सह.प्रा.मनिषा जगताप यांनी केले.

 

 

Web Title:  A training class filled with professors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.