मेगा ब्लॉकमुळे गाड्यांना ४ ते ५ तासांचा विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:29 AM2019-02-11T11:29:34+5:302019-02-11T11:30:03+5:30
ऐन लग्नसराईन प्रवाशांचे हाल
जळगाव : तांत्रीक कामासाठी रविवारी मुंबई येथे घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकमुळे ४ ते ५ तासांना रेल्वे गाड्या विलंबाने धावल्या. ऐन लग्नसराईत घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
मेट्रो लाईनच्या कामासाठी निळजे आणि कळंबोली दरम्यान रविवारी ट्राफिक आणि पावर ब्लॉक घेण्यात आल्याने या कामासाठी मध्य रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊनच्या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आली होती. तसेच भुसावळ - मुंबई पँसेंजरसह हुतात्मा एक्सप्रेसही रद्द करण्यात आली होती. यामुळे प्रवाशांना इतर सुपरफास्ट गाड्यांनी प्रवास करावा लागला. मात्र, या सुपरफास्ट गाड्यादेखील मेगाब्लॉकमुळे ४ ते ५ तासांनी उशिरा धावल्याने, प्रवाशांना स्टेशनवरच ताटकळत बसावे लागले. विशेष म्हणजे रविवारी मोठ्या प्रमाणावर लग्नसराई असल्याने, बहुतांश प्रवाशांनी गाड्यांची वाट न पाहता, खाजगी वाहनांनी प्रवास करतांना दिसून आले.
या एक्सप्रेस धावल्या विलंबाने
रेल्वे प्रशासनाने या कामासाठी अप आणि डाऊनच्या मार्गावरीलही वाहतूकही बंद ठेवली होती. यामुळे मुंबईकडुन येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस, मुंबई-जबलपुर गरीबरथ एक्सप्रेस, दरभंगा एक्सप्रेस, कामायानी एक्सप्रेस या गाड्या ३ ते ४ तासांनी विलंबाने धावल्या. तर जळगावहुन मुंबईकडे जाणाºया कामायानी एक्सप्रेस, कुशीनगर एक्सप्रेस, ताप्तीगंगा एक्सप्रेस, वाराणसी एक्सप्रेस या गाड्या ६ ते ८ तासांनी विलंबाने धावल्या.