ओडिसाकडे जाणाऱ्या गाड्या खुर्दा रोड स्टेशनपर्यंतच धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:12 AM2021-06-24T04:12:51+5:302021-06-24T04:12:51+5:30
भुसावळ रेल्वे विभागात योग दिन उत्साहात जळगाव : जागतिक योग दिनानिमित्त भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे योग शिक्षक एन. बी. परदेशी ...
भुसावळ रेल्वे विभागात योग दिन उत्साहात
जळगाव : जागतिक योग दिनानिमित्त भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे योग शिक्षक एन. बी. परदेशी यांनी ऑनलाईनद्वारे रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांना योगाचे विविध प्रकार शिकवून, योगाची माहिती दिली. यावेळी डीआरएम विवेककुमार गुप्ता, एडीआरएम मनोज कुमार सिन्हा, डीपीओ एम. एन. डी. गागुर्डे, दिलीप खरात, देवेंद्र विश्वकर्मा, आदी अधिकारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुलकर्णी आणि ग्रंथपाल एस. के. उपाध्याय यांनी केले.
महाराष्ट्र व आझाद हिंद एक्स्प्रेसला प्रवाशांची गर्दी
जळगाव : गेल्या आठवड्यापासून शासनाने सर्वत्र अनलॉक केल्यानंतर मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. विशेषत: पुण्याकडे जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, महाराष्ट्र व आझाद हिंद एक्स्प्रेसला प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. यामुळे स्थानिक प्रवाशांना आरक्षण तिकीट मिळत नसल्याने, त्यांची गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने या मार्गावर जादा गाड्या सोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
बाजारात प्लास्टिक कागद विक्रीला
जळगाव : पावसाळ्यात ग्रामीण भागात मातीची घरे पाझरत असल्यामुळे, आजही नागरिक यावर उपाय म्हणून प्लास्टिक कागद पाझरत्या भागात लावत असतात. त्यामुळे पावसाळ्यात या कागदांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. शहरातील सुभाष चौक, चित्रा चौक, दाणा बाजार या ठिकाणी या प्लास्टिक कागद विक्रेत्यांची ठिकठिकाणी दुकाने थाटली असून, पावसाळा सुरू झाल्यानंतर नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे.
शिरसोली नाक्यावर वाहतूक कोंडी
जळगाव : डीर्माट चौकातून पुढे शिरसोलीकडे जाताना रस्त्याच्या एका बाजूला प्रवासी रिक्षा व दुसऱ्या बाजूला खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या थाटत असल्यामुळे या ठिकाणी दिवसभरात अनेकवेळा वाहतूक कोंडी होत आहे. तसेच या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीचा थांबा मंजूर आहे. मात्र, थांब्यांच्या ठिकाणी खाद्यपदार्थांच्या हातगाड्या उभ्या राहत असल्यामुळे, अनेकवेळा बस थांब्यांच्या पुढे जाऊन थांबत आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, मनपा प्रशासनाने या चौकातील अतिक्रमण काढण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.