स्मृती शताब्दी वर्षातही बालकवींची उपेक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 01:22 PM2018-05-06T13:22:37+5:302018-05-06T13:22:37+5:30
अनास्था
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ६ - ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’, ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे’, ‘आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे’... अशा एकाहून एक सरस कवितांनी पिढ्यानपिढ्यांना भूरळ घातली, मात्र या कविता ज्यांच्या लेखणीतून उमटल्या त्या बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे या महान कवीच्या स्मृती शताब्दी वर्षातही त्यांच्या जन्मस्थळासह स्मृतीस्थळाबाबत उपेक्षा कायम आहे.
धरणागाव या जन्मगावी प्रस्तावित असलेले स्मारक मार्गी तर लागलेच नाही, शिवाय भादली (ता. जळगाव) रेल्वे स्टेशननजीक छोटेसे स्मृतीस्थळही रेल्वे वितारीकरणात विस्थापित होण्याच्या मार्गावर आहे.
आपल्या अवघ्या २८ वर्षात मराठी साहित्यात ज्यांनी असामान्य शैली, सृजनशीलतेचा ठसा उमटविला. त्या बालकवी ठोंबरे यांच्या निधनास ५ मे २०१८ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाले. ५ मे २०१७ ते ५ मे २०१८ हे वर्ष त्यांचे स्मृतीशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे. या वर्षातही स्मारकाच्या प्रश्नाकडे दुर्लक्षच झाल्याने साहित्य प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
ज्या गावात त्यांचे रेल्वे अपघातात निधन झाले त्या जळगाव-भुसावळ दरम्यान भादली या छोट्या स्टेशनवर त्यांचे स्मृतीस्थळ आहे. एखाद्या व्यक्तीची आठवण नंतरच्या पिढीला असावी यासाठी स्मृतीस्थळ अथवा पुतळा उभारला जातो. मात्र दुर्दैव म्हणजे जन्मशताब्दी वर्षात भादली येथील स्मृतीस्थळ भुसावळ-जळगाव रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणात हटविण्याच्या हालाचाली सुरू आहेत. त्यामुळे साहित्यप्रेमी निराश झाले आहेत.
लौकीक वाढला, मात्र उपेक्षा कायम
बालकवींच्या कविता पाठ्यपुस्तकात शिकवण्यात येऊ लागल्या. परंतु ज्याठिकाणी बालकवींचा मृत्यू झाला त्या भादली येथे बालकवींच्या स्मृतींच्या कुठल्याच खाणा-खुणा दिसत नव्हत्या. १९९० मध्ये मध्य रेल्वेच्या पुढाकाराने छोटे स्मृतीस्थळ निर्माण झाले. या स्थळावरील धूळ त्यांच्या जन्मदिनी १३ आॅगस्टला आणि त्यांच्या स्मृतिदिनी ५ मे याच दिवशी दूर केली जाते.
ज्या स्थळावर बालकवींचे हे स्मृतिस्थळ आहे त्या जागेवरून रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण होत आहे. विस्तारीकरणात स्टेशन आणि हे स्मृतिस्थळं हे दोन्हीही हलविण्यात येत आहे. याबाबत हे स्मृतिस्थळ संरक्षीत करण्याची मागणी जैन उद्योग समुहाच्या प्रसिद्धी विभागातील सहकारी किशोर कुलकर्णी यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू याच्याकडे केली आहे. हे स्थळही विस्तारीकरणात हलविले गेले तर १०० वर्षानंतर पुन्हा बालकवींचा मृत्यू होईल, असे किशोर कुलकर्णी यांचे म्हणणे आहे.
धरणगाव येथेही स्मारक उभारण्याबाबत प्रस्तावित होते, मात्र तेही मार्गी लागत नसल्याने नाराजीचा सूर आहे. राज्याच्या कान्याकोपऱ्यात आपल्या काव्य पंक्तींनी भूरळ घालणाºया या कवीच्या जन्मस्थळासह स्मृतीस्थळी स्मारक आकाराला येऊन स्मृतीशताब्दी वर्षी तरी उपेक्षा दूर व्हावी, हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असा विश्वास साहित्य प्रेमींनी व्यक्त केला आहे.
असा ओढावला मृत्यू
बालकवी ठोंबरे यांचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला हे दुर्दैव म्हणावे लागेल. ५ मे १९१८ रोजी भादली स्टेशनवर जात असताना केबिनपाशी पायवाट अरूंद असल्यामुळे ते रुळांच्या मध्यभागी चालू लागले. त्याचवेळी मागून आलेल्या रेल्वेने त्यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
शंभर वषार्नंतर बालकवींचा दुसºयांदा मृत्यू होईल
ज्या स्थळावर बालकवींचे हे स्मृतिस्थळ आहे त्या जागेवरून रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण होत आहे. विस्तारीकरणात स्टेशन आणि हे स्मृतिस्थळं हे दोन्हीही हलविण्यात येत आहे. याबाबत हे स्मृतिस्थळ संरक्षीत करण्याची मागणी जैन उद्योग समुहाच्या प्रसिद्धी विभागातील सहकारी किशोर कुलकर्णी यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू याच्याकडे केली आहे. हे स्थळही विस्तारीकरणात हलविले गेले तर १०० वर्षानंतर पुन्हा बालकवींचा मृत्यू होईल, असे किशोर कुलकर्णी यांचे म्हणणे आहे.
बालकवींचे जन्मस्थळ असलेल्या धरणगाव येथेही स्मारक उभारण्याबाबत प्रस्तावित होते, मात्र तेही मार्गी लागत नसल्याने नाराजीचा सूर आहे. इतक्या महान कवीबाबत मोठी आत्मीयता जळगाव जिल्हावासीयांना असून राज्याच्या कान्याकोपºयात आपल्या काव्य पंक्तींनी भूरळ घाळणाºया या कवीच्या जन्मस्थळासह स्मृतीस्थळी स्मारक आकाराला येऊन स्मृतीशताब्दी वर्षी तरी उपेक्षा दूर व्हावी, हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असा विश्वास साहित्य प्रेमींनी व्यक्त केला आहे.
असा ओढावला मृत्यू
अत्यंत उच्च कोटीच्या कविता रचणारे बालकवी ठोंबरे यांचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला हे दुर्दैव म्हणावे लागेल. बालकवींचा मृत्यू म्हणजे आत्महत्या होती, असेही काही म्हटले जाते. ५ मे १९१८ रोजी भादली स्टेशनवर जाऊन गाडीत बसण्यासाठी बालकवी घरून निघाले. बालकवी लोहमार्गापाशी पोहचले आणि तारांच्या कुंपणातून आत शिरून रेल्वे रुळाला लागून असलेल्या पायवाटेने भादली स्थानकाकडे जात असताना केबिनपाशी पायवाट अरूंद असल्यामुळे ते रुळांच्या मधून चालू लागले. त्याचवेळी मागून भुसावळकडून येणाºया रेल्वेगाडीची शिट्टी त्यांना ऐकू आली. ज्या गडीने आपणास जावयाचे आहे तीच गाडी आली असावी असे वाटून ते पळू लागले. मेन लाईनमधून पळता पळता ते सांध्यापाशी आले. बाजूला काम करणाºयांनी त्यांना ओरडून बाजूला होण्यास सांगितले. गाडी मेन लाईनने पुढे जाईल असे वाटून ते रूळ सोडून सांध्यापाशी डाव्याबाजूच्या सायडिंग लाइनीत शिरले. किंचित पुढे जाऊन रूळांच्या बाहेर पडणार तोच मालगाडी त्याच सायडिंग रुळावर काढलेली होती. रुळांच्या बाहेर पडणार तोच जोडा रुळात अडकला आणि अनर्थ झाला. मागून आलेली गाडीचे इंजिन त्यांच्या अंगावरून गेले आणि क्षणार्थात बालकवींचा देह छिन्नविछिन्न झाला.