संप मिटला नाही, स्थिती "जैसे थे"
By admin | Published: June 3, 2017 05:28 PM2017-06-03T17:28:27+5:302017-06-03T17:28:27+5:30
राज्यस्तरीय कृती समीतीची बैठक सुरू आहे,
ऑनलाईन लोकमत
यावल, जळगाव, दि. 3 - राज्यात शेतकरी संप मागे घेतला असल्याचे वृत्त असले तरी राज्यस्तरीय कृती समितीकडून आपणास अद्याप काहीही आदेश आले नसल्याने स्थिती जैसे थे आहे. राज्यस्तरीय कृती समीतीची बैठक सुरू आहे, बैठकीनंतर जे आदेश मिळतील त्या प्रमाणे निर्णय घेवू, असे यावल तालुक्यातील किनगाव येथील शेतकरी संघटनेचे खान्देश विभाग प्रमुख कडू पाटील यांनी सांगितले. तालुक्यात सुरू असलेल्या संपात कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा संघटनेने राजकीय विचार सोडून शेतक:यांच्या ङोंडय़ाखाली एकत्र यावे असे सुरुवातीलस ठरले असल्याने कोणतीही संघटना अथवा राजकीय पक्षाचा त्यात सहभाग नव्हता़ गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात राजकिय पक्षाचे पदाधिकारी सहभागी असले तरी ते राजकीय पक्षाचे नेते म्हणून नव्हे तर एक शेतकरी म्हणून सहभागी होते, असेही पाटील यांनी सांगितल़े
यावल येथील आठवडे बाजारात भाज्यांची आवक घटल्याचे दिसून आल़े त्यामुळे भाज्यांचे भाव कडाडले होते. संपकाळात शेतक:यांनी आपला शेतीमाल गावाबाहेर नेवू नये, असे संघटनेच्या वतीने सुरवातीलाच आवाहन केले असल्याने शेतीमाल कोठेही बाहेर जात नाही, असेही त्यांनी सांगितल़े