खरेदी-विक्री व्यवहारांच्या फेरफार नोंदी आता आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 09:48 PM2018-09-20T21:48:47+5:302018-09-20T21:53:34+5:30
अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे विशेष मोहीम
जळगाव: दुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या खरेदी-विक्री व्यवहारांच्या नोंदणीकृत दस्तांनुसार सातबारा उताऱ्यावर फेरफार नोंदी तहसीलदार कार्यालयातील फेरफार कक्षामार्फत न करता थेट तलाठ्यामार्फत करण्याची योजना जमा बंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे यांनी आखली आहे. त्यासाठी ७/१२वर जानेवारी २०१८ पासूनच्या सर्व खरेदी-विक्री व्यवहारांची फेरफार नोंद घेण्याची विशेष मोहीम जिल्हा प्रशासनातर्फे १५ सप्टेंबर पासून राबविण्यात येणार आहे.
अशी असेल मोहीम
१५ सप्टेंबर २०१८ रोजी तहसिलदारांनी दुय्यम निबंधक यांच्याकडून जानेवारी २०१८ पासून ते आजपर्यंतच्या सर्व खरेदी विक्री व्यवहारांच्या सूची क्र.२ च्या प्रती प्राप्त करून घेण्यात येणार आहेत. १७ रोजी दुय्यम निबंधक यांच्याकडील सूची क्र.२ च्या प्रती तलाठी यांना देणे, १७ ते २० सप्टेंबर या कालावधीत सूची क्र.२ वरून संगणकीकृत फेरफार घेतला आहे की नाही? याची तलाठी यांनी तपासणी करणे. २१ ते ३० सप्टेंबर दरम्यान तपासणीअंती घेण्यात न आलेल्या सूची क्र.२ ची आकडेवारी संकलीत करून संगणकीकृत फेरफार घेऊन नियमानुसार कार्यवाही करणे, ३१ सप्टेंबर रोजी मंडळ अधिकारी यांनी सदर फेरफारांवर निर्णय घेऊन अंतिम कार्यवाही करणे, ३ नोव्हेंबर रोजी तहसिलदार यांनी तलाठी यांच्याकडून सदर फेरफारची माहिती संकलित करून जिल्हाधिकाºयांना अहवाल सादर करणे.
अहवाल वेळेत सादर करण्याचे आदेश
या कार्यक्रमाची क्षेत्रीयस्तरावर प्रभावी अंमलबजावणी करून जानेवारी २०१८ पासूनच्या एकाही खरेदी-विक्री व्यवहाराची संगणकीकृत फेरफार नोंद घेण्याचे प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ही कार्यवाही ठरवून दिलेल्या मुदतीत पार पाडून मोहीम यशस्वी करण्याचे व त्याबाबत अहवाल वेळेत सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.
फेरफार कक्ष होणार बंद
जमाबंदी आयुक्तांनी १ जुलै २०१८ रोजी दिलेल्या आदेशनुसार तहसील कार्यालयातील फेरफार कक्ष बंद होणार असून दुय्यम निबंधक कार्यालयाकडून नोंदणीकृत झालेल्या दस्ताची माहिती थेट तलाठी लॉगइन उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. याची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यापूर्वी संगणकीकृत सातबारा अद्यावत व अचूक असणे आव श्यक असल्याने जानेवारी २०१८ पासून झालेल्या सर्व खरेदी विक्री व्यवहारांच्या फेरफार नोंदी त्यावर आहेत की नाही? हे तपासून त्याची पूर्तता करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
नागरिकांना तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही
खरेदी-विक्री व्यवहार केल्यानंतर त्याची सातबारावर नोंद घेण्यासाठी पूर्वी नागरिकांना तलाठ्याकडे फेºया माराव्या लागत असत. मात्र आता तो त्रास वाचणार आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्री व्यवहार झाल्यानंतर त्याची नोंद थेट तलाठ्याच्या संगणकीय लॉगइनवर जाईल. तलाठी ती नोंद तपासून इतर हक्की नोंद असल्यास संबंधीतांना नोटीस बजावेल. अन्यथा फेरफार नोंद सातबारावर घेऊन सातबारा अद्यावत करेल. पंधरा दिवसांनी संबंधीत अद्यावत नोंदीसह सातबारा संबंधीतांना आॅनलाईनवरूनही मिळू शकेल. त्यामुळे अडवणुकीचे प्रकार कमी होतील, अशी अपेक्षा आहे.
दुय्यम निबंधकांची जबाबदारी वाढणार
या सुधारीत प्रणालीत खरेदी-विक्री करणाºयांची ओळख पटविण्याची जबाबदारी दुय्यम निबंधकांवर येणार आहे.