चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी पालिकेकडे जागेचे हस्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:02 PM2018-09-28T12:02:04+5:302018-09-28T12:02:33+5:30

सिग्नल चौकातील ६८० चौ.मी. जागा मिळाली

Transfer of land to the Municipal Corporation for setting up statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Chalisgaon | चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी पालिकेकडे जागेचे हस्तांतर

चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी पालिकेकडे जागेचे हस्तांतर

googlenewsNext

चाळीसगाव, जि. जळगाव : सिग्नल चौकात उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुणार्कृती पुतळ्यासह शिवसृष्टीसाठी लागणारी त्रिकोणातील ६८० चौ.मी.जागा जिल्हाधिका-यांनी नगरपालिकेकडे हस्तांतर करण्याचे आदेश गुरुवारी दिले. यामुळे पुतळा व शिवसृष्टी भूमीपूजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निणार्याचे नागरिकांसह शिवप्रेमींनी स्वागत केले आहे.
सिग्नल चौकात पालिकेतर्फे शिवछत्रपतींचा पूर्णाकृती पुतळ्यासह शिवसृष्टी उभारण्याचा मनोदय आहे. मात्र गेल्या अनेक वषार्पासून जागेचा प्रश्न सुटत नसल्याने हा प्रश्न प्रलंबित होता. यासाठी सामाजिक संघटनांनी आंदोलने सुरुच ठेवली होती. सर्व्हे क्र.५१ मधील पाच हजार ९२३.६० चौ.मी. पैकी ६८० चौ.मी. जागा पुतळ्यासाठी पालिकेकडे वर्ग करण्याचे आदेश गुरुवारी जिल्हाधिका-यांनी तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.
 

Web Title: Transfer of land to the Municipal Corporation for setting up statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.