खान्देशातील ८ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, बुधवारी पहाटे काढले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 01:27 PM2023-04-12T13:27:44+5:302023-04-12T13:27:50+5:30
तीनही जिल्ह्यातील पुरवठा अधिकाऱ्यांसह जळगाव व धुळ्यातील निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश
कुंदन पाटील, जळगाव: महसुल विभागाने बुधवारी पहाटे काढलेल्या आदेशानुसार खान्देशातील आठ उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विभागांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात तीनही जिल्ह्यातील पुरवठा अधिकाऱ्यांसह जळगाव व धुळ्यातील निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून महसुल विभागातील बदल्या रखडल्या होत्या. बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास राज्यातील ८० उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी होताच अनेकांना धक्का बसला. त्यात नाशिक विभागातील १८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बदल्यांच्या आदेश जारी झाल्यानंतर अनेक जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात पुन्हा बदल्यांचे आदेश जारी होणार असल्याचे सांगण्यात आले.
खान्देशातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा तपशील
नाव- सध्याची नेमणूक बदलीचे ठिकाण
- किरण सावंत-पाटील- भूसंपादन, जळगाव- श्रीरामपूर प्रांताधिकारी
- राहुल पाटील- आरडीसी, जळगाव- निवडणूक विभाग, नगर
- सीमा अहिरे- प्रांत, अमळनेर- भूसंपादन, नाशिक
- हेमांगी पाटील महसुल, धुळे- प्रांत, निफाड
- राजेंद्र वाघ- भूसंपादन, ज़ळगाव- आरडीसी, नाशिक
- संजय गायकवाड- आरडीसी, धुळे- पुरवठा अधिकारी, जळगाव
- महेश शेलार- पुरवठा अधिकारी, नंदुरबार- पुरवठा अधिकारी, धुळे
- रमेश मिसाळ- पुरवठा अधिकारी, धुळे- पुरवठा अधिकारी, नाशिक
- शाहूराज मोरे- रोहयो, नंदुरबार पुनर्वसन अधिकारी, नगर