निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खान्देशातील ‘महसूल’च्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:15 PM2019-09-08T12:15:21+5:302019-09-08T12:15:36+5:30
भुसावळचे प्रांताधिकारी धुळ््याचे भूसंपादन उपजिल्हाधिकारी : नंदुरबारच्या तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या, डीएसओपद रिक्त, धुळ््याचे भूसंपादन उपजिल्हाधिकारी नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी
जळगाव : निवडणुकीशी संबंधित पदे भरणे तसेच प्रशासकीय कारणांमुळे खान्देशातील महसूल विभागातील अधिकाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली असून यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील सहा अधिकाºयांचा समावेश आहे. यात भुसावळचे प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांची धुळे येथे भूसंपादन उपजिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. तसेच जळगावचे भूसंपादन अधिकारी रामसिंग सुलाने यांची भुसावळ येथे प्रांताधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. या सोबतच नंदुरबार जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी व शहादा प्रांताधिकारी यांची बदली झाली आहे. जिल्हा पुरवठा अधिकाºयांच्या जागी मात्र कुणाचीही नियुक्ती नसल्याने हे पद रिक्त राहणार आहे. धुळ््याच्या भूसंपादनच्या उपजिल्हाधिकाºयांचीही बदली झाली आहे.
शासनाने शुक्रवारी उशिरा नाशिक विभागातील महसूलच्या अधिकाºयांचे बदली आदेश काढले. यामध्ये नंदुरबारचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांची श्रीरामपूर, जि.अहमदनगर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी गोगटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहाद्याचे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांची चाळीसगाव येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी चेतन गिरासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी विजय भांगरे यांची बागलानच्या उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी कुणाही अधिकारीची नियुक्ती झालेली नाही.
जिल्ह्यातून बदलून जाणाºया तिन्ही अधिकाºयांना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात निरोप देण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड व सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळचे प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांची धुळे येथे भूसंपादन उपजिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. तसेच जळगावचे भूसंपादन अधिकारी रामसिंग सुलाने यांची भुसावळ येथे प्रांताधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.
धुळे येथील भूसंपादन उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांची नाशिक येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.
अठरा हजार कर्मचाºयांची माहिती मागविली
अधिकाºयांच्या बदल्या होण्यासह जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील अकराही विधानसभा क्षेत्रात होणाºया निवडणुकीसाठी कर्मचाºयांची माहिती मागविली असून त्यांची नियुक्ती विधानसभेच्या कामासाठी करता येणार आहे.
जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ३० आॅगस्टला मतदानाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. दुसरीकडे मतदानासाठी लागणाºया यंत्रातील (ईव्हीएम मशिन) जुना ‘डेटा क्लिअर’ करून ती यंत्रे पुन्हा राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांच्या उपस्थितीत ‘सील’ करून ‘स्ट्रॉंगरूम’मध्ये ठेवली आहेत. आता विधानसभानिहाय मतदारसंघात मतदान केंद्रांची निवड करणे, तेथे सोयी-सुविधा उपलब्ध करणे याबाबत नियोजन सुरू आहे.
एका मतदान केंद्रात किमान पाच कर्मचारी याप्रमाणे जिल्ह्यातील अकरा मतदान केंद्रांमध्ये, सोबतच मतदान प्रक्रियेच्या इतर कामासांठी सुमारे अठरा हजार कर्मचाºयांची माहिती त्या- त्या विधानसभा क्षेत्रातील तहसील कार्यालयात ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू आहे. आचारसंहिता जाहीर होताच संबंधितांना नियुक्तीबाबत पत्रे पाठविली जाणार आहेत.