उत्पादन शुल्कच्या खान्देशातील सात अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्याच्या आयुक्तांनी जारी केले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 17:45 IST2021-08-10T17:44:28+5:302021-08-10T17:45:05+5:30

उल्हासनगर येथील रामकृष्ण लांजेकर व आयुक्तालयातील भरारी पथकाचे दिलीप काळेल यांची धुळे येथे बदली झाली आहे.

Transfers of seven officers in the excise department; Order issued by the Commissioner of State | उत्पादन शुल्कच्या खान्देशातील सात अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्याच्या आयुक्तांनी जारी केले आदेश

उत्पादन शुल्कच्या खान्देशातील सात अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्याच्या आयुक्तांनी जारी केले आदेश

जळगाव: राज्य उत्पादन शुल्क विभागातील राज्यातील १५० दुय्यम निरीक्षकांच्या मंगळवारी बदल्या झालेल्या आहेत. त्यात जळगाव, धुळे व नंदूरबार या तीन जिल्ह्यातील सात जणांचा समावेश आहे. बाहेरुन दोन अधिकारी धुळ्यात बदलून येत आहेत. राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी हे आदेश जारी केलेले आहेत.

जळगाव येथील विकास पाटील यांची नाशिक विभागीय भरारी पथक, पाचोरा येथील दुय्यम निरीक्षक वसंत मधुकर माळी यांची कोनगाव, ठाणे येथे, जळगाव येथील सीमा तपासणी नाक्याचे विजय नाईक यांची कोल्हापूर, यावल येथील केदारगीर निरंगनगीर बुवा यांची औरंगाबाद, नंदूरबार येथील शैलेंद्र दत्तात्रय मराठे यांची वैजापूर, औरंगाबाद येथे, धुळे येथील किशोर नानासाहेब गायकवाड यांची पालघर व शहादा येथील गणपतराव गुणवंतराव अहिरराव यांची नाशिक शहर यांचा समावेश आहे. उल्हासनगर येथील रामकृष्ण लांजेकर व आयुक्तालयातील भरारी पथकाचे दिलीप काळेल यांची धुळे येथे बदली झाली आहे.

Web Title: Transfers of seven officers in the excise department; Order issued by the Commissioner of State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.