परिवर्तनचे उपक्रम कलेच्या वाढीसाठी पोषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:15 AM2021-02-15T04:15:42+5:302021-02-15T04:15:42+5:30

चित्रप्रदर्शन : परिवर्तन दशकपुर्ती निमित्ताने आयोजन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कला व कलावंतांसाठी परिवर्तन उत्तम काम करत आहे. ...

Transformation activities are conducive to the growth of art | परिवर्तनचे उपक्रम कलेच्या वाढीसाठी पोषक

परिवर्तनचे उपक्रम कलेच्या वाढीसाठी पोषक

Next

चित्रप्रदर्शन : परिवर्तन दशकपुर्ती निमित्ताने आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कला व कलावंतांसाठी परिवर्तन उत्तम काम करत आहे. चित्रकलेसाठी परिवर्तनने गेल्या दशकात उत्तमोत्तम प्रदर्शने, चित्र साक्षरता सारख्या उपक्रमांनी कलेच्या प्रांतात जळगावचे नाव देशभरात पोहचवले आहे. त्यामुळे हे प्रदर्शन त्यांना समर्पित केल्या असल्याच्या भावना चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी उपस्थित चित्रकारांनी केले.

परिवर्तन संस्थेच्या दशकपूर्ती निमित्ताने खान्देशातील चित्रकारांनी एकत्र येऊन पु. ना. गाडगीळ आर्ट गॅलरीत ''शोध'' नावाचे हे प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते झाले. उपायुक्त प्रशांत पाटील, सुधीर भोंगळे, राजेंद्र पाटील, विजय वाणी, परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील, सुनील बारी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य राजू महाजन यांनी केले.

यावेळी चित्रकार राजू महाजन, राजू बाविस्कर, विकास मलारा, अरविंद बडगुजर, अतुल मालखेडे, विजय जैन, तरूण भाटे, सुशील चौधरी, वसंत नागपूरे, पंकज नागपूरे, सुनील ताडे, सुबोध कांतायन, निरंजन शेलार, वंदना परमार, प्रशांत तिवारी, चेतन पाटील, यशवंत गरूड, हर्षदा मस्के, निलेश शिंपी, कैलास सोनगिरे, जितेंद्र साळुंखे, वंदना चौधरी, मनोज जंजाळकर उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप गायिका अनुषा महाजन यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने केला. सुत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले. हे प्रदर्शन २८ फेब्रुवारी पर्यंत असणार आहे.

Web Title: Transformation activities are conducive to the growth of art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.