‘परिवर्तन’ने सर्व कलांना एकत्र आणले

By admin | Published: June 16, 2017 10:33 AM2017-06-16T10:33:36+5:302017-06-16T10:33:36+5:30

कलावंतांचा सूर : यंदा बहुभाषिक अभिवाचन महोत्सव आयोजित करणार

'Transformation' brought together all the arts | ‘परिवर्तन’ने सर्व कलांना एकत्र आणले

‘परिवर्तन’ने सर्व कलांना एकत्र आणले

Next

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.16- केवळ नाटय़ क्षेत्रापुरते मर्यादित न रहाता साहित्य, चित्रकला, नृत्य यासह विविध कलांना एकत्र आणून परिवर्तन संस्थेने एक वेगळी चळवळ निर्माण करण्याचा प्रय} केला. या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रातील कलाकारांना दुस:या क्षेत्राची जवळून ओळख होऊन त्याच्या प्रगल्भतेत वाढ होत असल्याचा सूर ‘लोकमत व्यासपीठ’ या उपक्रमात उमटला. 
‘परिवर्तन’ या संस्थेला नुकताच अ.भा. नाटय़ परिषदेतर्फे देण्यात येणारा विनय आपटे व भाई बोरकर सर्वोत्कृष्ट संस्थेचा मानाचा पुरस्कार मिळाला. यानिमित्त ‘लोकमत’ने परिवर्तनच्या सदस्यांसोबत अनौपचारिक गप्पा आयोजित केल्या. त्यात ‘परिवर्तन’चे सदस्य अशोक कोतवाल, हर्षल पाटील, मंजुषा भिडे, राजू बाविस्कर, डॉ.अपर्णा भट, वसंत गायकवाड, होरिलसिंग राजपूत, मंगेश कुलकर्णी, संदीप केदार, मोना तडवी, राहुल निंबाळकर आदी उपस्थित होते. त्यांचे स्वागत ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
‘परिवर्तन’चा सहा वर्षाचा प्रवास, वेगवेगळ्या उपक्रम आयोजनाचे अनुभव, व्यक्तिमत्व विकासातील योगदान याविषयी सदस्यांनी मनमोकळा संवाद साधला. 
प्रतिसाद वाढत गेला
नाटय़क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे शंभू पाटील यांच्या पुढाकारातून परिवर्तन संस्थेची सुरुवात 2011 पासून    झाली. पहिल्या वर्षी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या. 8 संघांनी यात सहभाग नोंदविला. सलग सहा वर्षे हा उपक्रम राबविला गेला. 
 या माध्यमातूनच परिवर्तनची चर्चा कला क्षेत्रात वाढत गेली. नृत्य स्पर्धा, साहित्य चर्चा, नेमाडे महोत्सव, अभिवाचन महोत्सव असे उपक्रम राबविण्यात आले आणि त्यातून कलाकार घडत गेले. 
सादरीकरणात स्वातंत्र्य
जे सादर करावयाचे आहे त्यासाठी आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य असते. जे मांडायचे त्या विषयावर सविस्तर चर्चा होतात. जबाबदारी सोपविली जाते. यातून आम्ही घडत गेलो. सृजनशिलतेत वाढ होऊन प्रगल्भता वाढण्यात निश्चितच मदत झाली आहे. व्यासपीठ मिळत गेल्याने अनुभव येत गेले व स्व परिवर्तन आम्ही अनुभवतो आहोत. 
नवा जुना असा भेद नाही
राज्यभर प्रवास होत गेला. विद्यापीठ, शाळा, महाविद्यालये अशा विविध ठिकाणी सादरीकरणाची संधी मिळत गेली, अशा भावनाही यावेळी व्यक्त केल्या. 
नवीन वर्षात विविध उपक्रम
 विविध क्षेत्रातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा परिवर्तनचा प्रय} आहे. यंदा बहुभाषिक अभिवाचन महोत्सव, दोन नाटय़ महोत्सव, भावांजली असे कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत.  विविध व्यक्ती आणि संस्था मदत करीत असतात. त्यातूनच शहरातील कला क्षेत्राला प्रोत्साहन मिळत असल्याचे परिवर्तनच्या सदस्यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: 'Transformation' brought together all the arts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.