६ हजार विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
By admin | Published: February 12, 2017 12:40 AM2017-02-12T00:40:18+5:302017-02-12T00:40:18+5:30
अग्रवाल चौकात दररोज विविध शाळा व महाविद्यालयातील सुमारे ६ हजार विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात टाकून महामार्ग ओलांडावा लागतो.
जळगाव : महामार्गावरील अग्रवाल चौकात दररोज विविध शाळा व महाविद्यालयातील सुमारे ६ हजार विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात टाकून महामार्ग ओलांडावा लागतो. चौकात दिवसागणिक वाढत असलेली अतिक्रमणे, साईडपट्ट्या व महामार्गाच्या दोन्ही बाजूस असलेल्या रस्त्यांची झालेली दैना यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. एवढ्या समस्या असूनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
शहरातील महामार्गावर असलेल्या इतर चौकांच्या तुलनेने या चौकात ये-जा करणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र चौकात निर्माण झालेल्या अतिक्रमण व समांतर रस्त्याचा दुरावस्थेमुळे वाहनधारकांसह विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेवून हा रस्ता ओलांडवा लागत असतो. चौकात गेल्या काही वर्षांमध्ये अपघातांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. तर काहींना आपले जीव देखील गमवावे लागले आहे. मात्र प्रशासनाकडून या चौकातील समस्यांकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे. अपघात रोखण्यासाठी चौकातील अतिक्रमण हटवून, समांतर रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
चौकाच्या एका बाजुस मू.जे. महाविद्यालय, आॅरिआॅन स्कूल, ए.टी.झांबरे महाविद्यालय आहे. सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शाळा भरताना चौकात विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. त्याच प्रमाणे दुपारी १२ वाजता सकाळ सत्राची शाळा सुटते व दुपार सत्राची शाळा भरत असते. यामुळे या चौकाला यात्रेचे स्वरुप प्र्राप्त होते. यावेळेस चौकात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. ती होवू नये यासाठी आकाशवाणी, प्रभात चौक प्रमाणे या चौकात देखील सिग्नलची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नेहमी होत असते. सिग्नलची व्यवस्था होईपर्यंत किमान सकाळ, दुपारी व सायंकाळी वाहतूक पोलिसाची नियुक्ती करणे आवश्यक आहे.
वाहतूक कर्मचाºयाची नियुक्ती करणे आवश्यक
चौकात होणाºया वर्दळीच्या काळात वाहतूक कर्मचारी उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र दिवसभरात या ठिकाणी एकही वाहतूक कर्मचारी उपस्थित राहत नाही. यामुळे सुसाट जाणाºया वाहनधारकांवर कोणतेही नियंत्रण नसते. इतर चौकांमध्ये ३ ते ४ कर्मचारी असतात. मात्र या चौकात एक कर्मचारी राहिल्यास बेशिस्त वाहतुकीला आळा बसू शकतो. मात्र वाहतूक विभागाकडून येथे होणाºया वाहतुककोंडीविषयी गांभिर्याने घेतले जात नसल्याचे चित्र आहे. तसेच अग्रवाल हॉस्पिटलकडील भागात फर्निचर विक्रेत्यांनी देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. महानगर पालिका प्रशासनाकडून या अतिक्रमणाकडे कानाडोळा केला गेला जात आहे.
साईडपट्ट्यांची पुन्हा दुर्दशा
चौकात मू.जे.महाविद्यालयाकडून येणाºया रस्त्याची मोठ्या प्रमाणात दैना झाली होती. त्यानंतर रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज असताना त्या ठिकाणी केवळ मुरुम टाकण्यात आला. मात्र तो मुरुमच वाहनधारकांसाठी अडचणीचा ठरत आहे. या रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मुरुम व्यवस्थित न दाबल्याने मोटारसायकल स्लिप होत आहेत. तसेच बहिणाबाई उद्यानाकडून येणाºया रस्त्यावरून देखील अशीच कसरत करावी लागत असते. तर अंकुर हॉस्पीटलच्या रस्ता उखळला आहे. या रस्त्यावरुन महामार्गाकडे जाताना अनेकदा अपघाताचा धोका कायम असतो.
चौकात विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. मात्र या चौकातही एकही वाहतूक कर्मचारी उपस्थित नसतो. अपघातांसाठी सर्वात धोकादायक हा चौक आहे. यासाठी चौकात सिग्नल व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबत गांभिर्याने विचार केला जात नाही. शाळा भरण्याच्या व सुटण्याचा वेळी इतर मार्गाकडून येणारी वाहतूक ही थांबविली गेली पाहिजे.
-चंद्रकांत भंडारी, शिक्षण समन्वयक, शालेय विभाग, केसीई सोसायटी
अग्रवाल चौकाच्या दोन्ही बाजूस अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मनपा प्रशासनाने या अतिक्रमणधारकांवर कारवाई केली पाहिजे. तसेच समांतर रस्त्यांची देखील, दुरावस्था झाली आहे. प्रशासनाने या चौकानजीकच्या रस्त्यांची डागडुजी करायला हवी.
-छगन नेहते, भुषण कॉलनी
शहरातील महामार्ग परिसरात असलेल्या चौकांमध्ये हा चौक अत्यंत महत्वाचा आहे. वर्दळीचा चौक असल्याने नेहमी वाहतूक कोंडी होत असते. चौकात सिग्नल व्यवस्था बसविण्यात आली तर कोंडीची समस्या मार्गी लागू शकते.
-प्रविण चौधरी, रामानंद नगर