नशिराबादला विनाकारण फिरणाऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:15 AM2021-04-18T04:15:50+5:302021-04-18T04:15:50+5:30
नशिराबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासह कोरोना स्प्रेडर शोधण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद व पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त ...
नशिराबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासह कोरोना स्प्रेडर शोधण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद व पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे रस्त्यावर विनाकारण फिरणा-यांची थेट रस्त्यावरच ॲण्टिजेन टेस्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्या दिवशी गावात विनाकारण फिरणाऱ्या १३७ लोकांची पोलीसस्टेशन आवारात तपासणी करण्यात आली. त्यात एक व्यक्ती पाॅझिटिव्ह आली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने काही निर्बंध घालून दिले आहेत. दुसरीकडे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या रात्रीच्या संचारबंदीमध्ये विनाकारण फिरताना आढळून येणाऱ्यांची तिथेच ॲण्टिजेन चाचणी केली जाणार आहे. गावातील सर्वच किराणा दुकानदारांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन अग्निहोत्री, पी.डी. कोळी, अशोक पाचपांडे, शेखर हिवरे, गणेश राजपूत, राजाराम पाचपांडे, विनोद कोळी, सहायक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे आदींनी सहकार्य केले. पोलीस स्टेशन आवारात झालेल्या या तपासणी मोहिमेप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील उपस्थित होते.
दरम्यान, गावामध्ये विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाईही करण्यात येत होती.