आदिवासी दाम्पत्याची हत्या
By admin | Published: February 7, 2017 01:30 AM2017-02-07T01:30:37+5:302017-02-07T01:30:37+5:30
रुईखेडा : खुनाचे कारण गुलदस्त्यात, अपर अधीक्षकांची भेट
यावल : आदिवासी वस्तीत राहणा:या एका आदिवासी दाम्पत्याची कु:हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना रुईखेडा (ता. यावल) या सातपुडय़ातील जंगलात रविवारी रात्री उघडकीस आली़
कलजा लक्ष्मण पावरा (26) व त्याची प}ी रिताबाई पावरा (23) असे असे या दाम्पत्याचे नाव आहे. खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यात आह़े
यावल तालुक्याच्या उत्तर सीमेवरील सातपुडा पर्वताच्या घनदाट जंगलात सुमारे 100-150 कुटुंबियाचा पाडा आहे. या पाडय़ावरील पावरा दाम्पत्य जंगलात डिंक गोळा करण्यासाठी रविवारी सकाळी गेले होते. रात्री उशिरार्पयत ते घरी न परतल्याने नातेवाईक व ग्रामस्थांनी जंगलात शोध घेतला असता नाल्याच्या काठावर दोघे पती-प}ी मृतावस्थेत आढळल़े
दोघांचे मृतदेह यावल येथे सोमवारी दुपारी आणण्यात आले व रात्री मृतदेह विच्छेदनासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहेत़
रिता हिचे माहेर चिंचोला, ता.चोपडा येथील आहे. त्यांना पाच वर्षाचा मुलगा आहे. कलजा याचे वडील लक्ष्मण जामसिंग पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिसरातील आदिवासींचा डिंक गोळा करण्याचा व्यवसाय आहे. यासाठी आदिवासींची हद्द ठरलेली असते.
दाम्पत्याचा खून कशासाठी झाला हे सांगणे सध्या शक्य नाही, सर्व बाबी तपासून पाहण्यात येत असल्याचे अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितल़े
सोमवारी पहाटे याबाबतची माहिती मिळताच फैजपूरचे पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात, फौजदार अशोक अहिरे, हवालदार पांडुरंग सपकाळे, संजय सपकाळे, सुमित बाविस्कर, चालक जाकीर शेख यांनी जंगल गाठले. अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती जाणून घेतली़ (वार्ताहर)