आदिवासींचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2017 12:26 AM2017-04-20T00:26:52+5:302017-04-20T00:26:52+5:30

यावल : योजनेचा लाभ मिळण्याची मागणी

Tribal Fasts | आदिवासींचे उपोषण

आदिवासींचे उपोषण

Next

यावल : यावल आदिवासी एकात्मिक प्रकल्प  कार्यालयाकडे २०१२ ते १५ या तीन वर्षातील   वैयक्तिक लाभ योजनेचा ६५ लाख रुपयांचा निधी पडून असल्यानंतरही उपरोक्त काळातील पात्र लाभार्र्थींना अद्याप लाभ मिळाला नाही.
सदर काळातील योजनेचा लाभ मिळावा यासाठी गेल्या अनेकर् ंकार्यालयाच्या चकरा मारूनही लाभ मिळत नसल्याने बुधवारी येथील कार्यालयाच्या आवारात तालुक्यातील आडगाव-कासारखेडा येथील २८ जणांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.
यावल आदिवासी प्रकल्प कार्यालयाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेपैकी वैयक्तिक लाभ योजना आहे.  २०१२ ते १५ या वर्षातील पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ मिळालेला नाही. तीन आर्थिक वर्र्षातील सदर  योजनेचा या कार्यालयाकडे ६५ लाख १८ हजार रुपयांचा निधी पडून आहे. उपोषणार्थींनी याबाबत वारंवार कार्यालयास निवेदन देऊन माहिती विचारली असता कार्यालयाकडून उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याने लाभार्थींमध्ये संताप व्यक्त होत आहे.   आदिवासी तडवी एकता मंचचे राज्याध्यक्ष एम.बी. तडवी यांनी  उपोषणार्थींना पाठिंबा जाहीर केला आहे.
मनसेचे शहराध्यक्ष चेतन आढळकर यांनी उपोषणास पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत योजनेच्या लाभार्र्थींना लाभ दिला जाणार नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे उपोषणार्थींचे म्हणणे आहे.
 (वार्ताहर)  

Web Title: Tribal Fasts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.