सावदा येथे आदिवासी सामूहिक विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 10:14 PM2019-05-05T22:14:29+5:302019-05-05T22:18:32+5:30

आसेम आदिवासी सेवा मंडळातर्फे आयोजित सोहळ्यात रविवारी ठिकठिकाणची आदिवासी समाजातील १६ जोडपी विवाहबद्ध झाली.

Tribal mass wedding ceremony at Sawada | सावदा येथे आदिवासी सामूहिक विवाह सोहळा

सावदा येथे आदिवासी सामूहिक विवाह सोहळा

googlenewsNext
ठळक मुद्देआदिवासी समाजातील १६ जोडपी विवाहबद्धमध्य प्रदेशासह ठिकठिकाणच्या जोडप्यांचा सोहळ्यात सहभागकार्यक्रमाच्या सुरवातीला शहिद जवानांना श्रध्दांजली

सावदा, ता.रावेर, जि.जळगाव : आसेम आदिवासी सेवा मंडळातर्फे आयोजित सोहळ्यात रविवारी ठिकठिकाणची आदिवासी समाजातील १६ जोडपी विवाहबद्ध झाली.
आसेम परिवारातर्फे सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचे हे यंदा २४ वे वर्ष आहे. मध्य प्रदेश, अमरावती, औरंगाबाद, कन्नड, जामनेर, रावेर या ठिकाणाहून १६ जोडपी आणि त्यांचे नातेवाईक मंडळी आलेली होती. सर्व अनाठायी खर्चाला फाटा देऊन सामूहिक लग्न सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला शहिद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. आसेम परिवाराकडून भिल तडवी समाजाचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी उपक्रमाचा शुभारंभ केला. त्यांचा सत्कार राजू बिºहाम यांच्या हस्ते करण्यात आला. जमसंग्राम संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे यांचा सत्कार पाल येथील सरपंच कामील यांच्या हस्ते करण्यात आला.
सामूहिक विवाहाची ही परंपरा चालू ठेवा व समाजात क्रांती घडवा, असा संदेश माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या भाषणात दिला व नवदाम्त्यांना आशीर्वाद दिले. पुढच्या काळात असेच एकत्र येणे काळाची गरज आहे. राजू बिºहाम यांनी खूप मोठी जबाबदारी घेतली असून, ते मनापासून काम करतात. त्यांचे मी अभिनंदन करतो, त्यांचव आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे आवाहनही चौधरी यांनी केले.
विवेक ठाकरे यांच्या वतीने स्टील बादली, हंडा, कळशी, परात, सहा ग्लास सेट याप्रमाणे संसारोपयोगी ५१ हजारांची भांडी दिली. यावेळी नगरसेविका मीनाक्षी कोल्हे, नजमा तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Tribal mass wedding ceremony at Sawada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.