नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी पाडे डिसेंबरपर्यंत प्रकाशमान होणार - संचालक विश्वास पाठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 10:39 PM2018-11-13T22:39:26+5:302018-11-13T22:40:06+5:30
जळगाव जिल्ह्यात फ्रॅन्चाईसीचा विचार नाही
जळगाव : सौभाग्य अर्थात ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर’ योजनेद्वारे राज्यातील गावागावात वीज पोहचली आहे केवळ नंदुरबार जिल्ह्यातील मोजक्याच पाड्यांमध्ये अद्याप वीज पोहचलेली नाही. डिसेंबरपर्यंत तेथे वीज पोहचेल असा विश्वास, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक तथा भाजपाचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी जळगावात दिली.
जळगाव जिल्हयात २०१४-१५ ते २०१७-१८ या चार वर्षाच्या काळात विद्युतीकरणाच्या बळकटीकरणासाठी राबविण्यात आलेल्या योजना व कार्यक्रम वाटचालीची माहिती देण्यासाठी मंगळवारी अल्पबचत भवन येथे पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
यावेळी ऊर्जामंत्र्यांचे माध्यम सल्लागार विवेक जोशी, जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) चंद्रशेखर मानकर, अधीक्षक अभियंता फारुख शेख, महापारेषणचे अधीक्षक अभियंता जगन्नाथ चुडे (भुसावळ)उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यात थकबाकी, वीज गळतीचे प्रमाण अधिक
पाठक म्हणाले, वीज गळतीचे प्रमाण राज्यात मोठ्या प्रमाणात कमी केले आहे मात्र जळगाव जिल्ह्यात थकबाकी व वीज गळतीचे प्रमाण अधिक आहे. वीज चोरी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. जिल्ह्यात भूमिगत वीज वाहिन्यांना प्राधान्य आहे, मात्र त्यास खर्च अधिक आहे.
वीज मीटरची उपलब्धता
ग्राहकांना वेळेत वीज मीटर मिळत नाही, अशा तक्रारी वाढत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी वीज मीटरसाठी कागदपत्रांची पूर्तता झाल्यास लगेच वीज मीटर मिळू शकेल, असे सांगितले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांमुळे बचत
वीज कंपन्यांमध्ये कंत्राटी कर्मचारी भरती बाबत विचारले असता हल्ली कमी खर्चात कंपन्यांना कंत्राटी कर्मचारी मिळतात. त्यामुळे तेथे खर्चाची बचत होते व ग्राहकांना स्वस्त वीज देण्यास मदत होते, असे गणित विश्वास पाठक यांनी या वेळी मांडले. या वेळी त्यांनी खाजगीकरण, छोटे युनिट यांचे फायदे सांगत भारनियमन रोखण्यासाठी करण्यातयेणाºयाउपाययोजनांचीमाहितीदिली.
शेतक-यांना पुरेसी वीज
राज्यात भारनियमन बंद केले असून ८ ते १० तासांपेक्षा अधिक वेळ कृषी पंपांसाठी वीजपुरवठा देवू शकत नसल्याचे सांगत पाठक म्हणाले की, जास्त वेळ वीज दिल्यास जमिनीच्या भूगर्भातील पाणीसाठा नष्ट होवून पर्यावरणाचा ºहास होणार असल्याचेही शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून निष्कर्ष काढला आहे. शेतकºयांना रात्रीच्या वेळी वीज पुरवठा होत असल्याने अडचणी येतात. त्यावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविली जात असून त्याद्वारे दिवसाही शेतकºयांना वीज मिळण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
ऊर्जा विकासाची २३९ कोटींची कामे पूर्ण
महावितरणच्या जळगाव मंडळाने ग्राहकांना अखंडित व शाश्वत वीजपुरवठा आणि सर्वोत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने मागील ४ वर्षात विद्युत यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी मुलभूत सुविधा निर्मितीची भरीव कामे केली असल्याचे सांगत जळगाव जिल्ह्यात विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी २३९ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याचे पाठक म्हणाले. तसेच ४८९ कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहे.
जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून २० कोटीची विद्युतिकरणाची कामे झाली असून ५५ हजार लाभार्थींना त्याचा लाभ झाला असल्याचे सांगण्यात आले. या सोबतच पुर्नरचित गतिमान ऊर्जा विकास व सुधारणा कार्यक्रमातून ५० कोटी ३६ लाखाची कामे पूर्ण झाले असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
ठळक मुद्दे
- पुर्नरचित गतिमान ऊर्जा विकास व सुधारणा कार्यक्रमातून जळगाव जिल्ह्यात कार्यान्वित ८ नवीन उपकेंद्र
- पायाभूत आराखडा टप्पा-२ योजनेतून १५२ कोटी ९९ लाख निधीची कामे पूर्ण
- एकात्मिक ऊर्जा विकास योजनेसाठी ९० कोटी ५४ लाख निधी मंजूर
- दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेसाठी ६८ कोटी ४१ लाख निधी मंजूर
- अटल सौर कृषी पंप योजनेतून १९१ शेतकºयांना लाभ
- सौभाग्य योजनेतून ५० हजार कुटूंबे प्रकाशमान