आदिवासी जनता हक्कासाठी एकवटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:29 PM2020-08-10T12:29:22+5:302020-08-10T12:29:34+5:30
केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध : लोकसंघर्ष मोर्चातर्फे निदर्शने
जळगाव : आदिवासी गौरव दिनासोबतच रविवारी आदिवासी दिनी केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण व सातपुड्याच्या दऱ्याखोºयातील शेकडो लोक गावागावात लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने किसान मुक्ती आंदोलन लोकांनी निदर्शने व घोषणा देत आंदोलन केले.
क्रांतीदिनाचे औचित्य साधत देशभरातील किसान आंदोलनांनी मिळून राष्ट्रीय पातळीवर संघटीत झालेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी शेतकऱ्यांवर सातत्याने होणाºया अन्यायाविरुद्ध व त्यांच्या मागण्यांकडे होणाºया दुर्लक्षामुळे त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी किसान बचाव कॉपोर्रेट भगाव चा नारा देत देशव्यापी किसान आंदोलनाची हाक दिली होती. त्याप्रमाणे लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने चोपडा, यावल, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, अमळनेर, पारोळा चाळीसगाव व जळगाव तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील गावागावात कोरोनाचे नियम पाळत व शारीरिक अंतर पाळत लोकांनी आपला शेती आणि आपल्या जल, जंगल, जमीन या नैसर्गिक संसाधानांवरचे हक्क राखण्यासाठी केंद्र्र शासनाने केलेल्या कायद्यातील बदलांचा निषेध केला.
जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बहुल गावामध्ये आदिवासी गौरव दिवस ही आपल्या आदिवासी नेत्यांच्या प्रतिमा पूजन करत व किसान दिना निमित्त एल्गार पुकारत आदिवासी गौरव दिन ही साजरा झाला.
लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, मुकुंद सपकाळे, संजय पवार, विनोद देशमुख, प्रमोद पाटील, अमोल कोल्हे, भरत बारेला, पन्नालाल मावळे, धर्मा बारेला,गाजू दादा, संजय शिरसाठ, ताराचंद बारेला, प्रकाश बारेला, इरफान तडवी, हैदर तडवी, नुरा तडवी, अहमद तडवी उपस्थित होते.
आदिवासी दिन : विविध मागण्यांसाठी आंदोलन
त्वरित कर्जमुक्ती करा, शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या, शेतकरी व आदिवासींच्या विरोधातील काढलेले अध्यादेश तात्काळ मागे घ्या, शेतकºयांचे वीजबिल माफ करत वीज सुधारणा बिल २०२० मागे घ्या, डीझेलच्या किंमती कमी करा, कोरोना काळात शेतकरी व कष्टकरी वर्गाला पूर्ण रेशन द्या, दुधाला हमीभाव वाढवून द्या, आदिवासींना त्यांनी दाखल केलेले दावे त्वरित निकाली काढून त्यंच्या शेतीचा अधिकार द्या, अशा विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. तालुकास्तरावर तहसीलदारांना दि. १० आॅगस्ट रोजी निवेदनही देण्यात येणार आहे.