चोपड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 08:58 PM2019-08-14T20:58:37+5:302019-08-14T20:58:49+5:30
वैजापूर येथील अत्याचाराचा निषेध : आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, तहसीलदारांना निवेदन
चोपडा : तालुक्यातील वैजापूर येथे दोन अल्पवयीन आदिवासी बहिणींवर १३ रोजी रात्री देवेंद्र मोरे याने अमानुष लैंगिक अत्याचार केले. त्याच्या निषेधार्थ तसेच दोषीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करीत आदिवासी विद्यार्थी संघटनेतर्फे शहरात मोर्चा काढण्यात आला.
घटनेतील आरोपी मोरे यास लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी तहसीलदार अनिल गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
१३ रोजी वैजापूर येथे रात्री सात व पाचवर्षीय अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली.
याविरोधात १४ रोजी आदिवासी विद्यार्थ्यांनी चोपडा येथे शासकीय निवास स्थानापासून तहसील कार्यालयावर मूकमोर्चा नेला. अत्याचार करणाऱ्या देवेंद्र मोरे याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर जामसिंग बारेला, दारासिंग पावरा, माजी पंचायत समिती सभापती गोपाल सोनवणे, समाधान सपकाळे, समाधान सोनवणे, जेमराय पावरा, नामसिंग पावरा, दिनेश पावरा, साहेबराव पावरा, महेंद्र पावरा, संजय पाडवी, देवळा पावरा, अंजली पावरा, बबिता पावरा, गीता पावरा, भारती पावरा, सुनीता पावरा, रंजना पावरा, कालुसिंग पावरा यांच्या सह्या आहेत.
याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल करीत आहेत. या कृत्याने तालुक्यासह जिल्हाभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजबांधवांतून विविध स्तरांवर निषेध व्यक्त होत आहे.
२० पर्यंत कोठडी
आरोपीस अमळनेर येथील विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश पळसपगार यांनी त्यास २० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.