आदिवासींनी वनकर्मचाऱ्यांना तीन तास डांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 09:29 PM2019-08-07T21:29:13+5:302019-08-07T21:29:18+5:30

शेवरे येथील घटना : वृद्धास मारहाण केल्याने झाले संतप्त

The tribals dumped forest workers for three hours | आदिवासींनी वनकर्मचाऱ्यांना तीन तास डांबले

आदिवासींनी वनकर्मचाऱ्यांना तीन तास डांबले

Next



---
लोकमत न्यूज नेटवर्क
बिडगाव, ता.चोपडा : देवझिरी वनक्षेत्रातील वरगव्हाण परिमंडळातील शेवरे येथे बुधवारी सकाळी वनकर्मचाऱ्यांनी वृद्धास मारहाण केली. या कारणावरून मारहाण करणारे सोडून दुसºयाच दोन वन कर्मचाºयांना शेकडो महिला व पुरूषांनी वाद घालत तब्बल तीन तास एका ठिकाणी डांबून ठेवल्याची घटना ७ आॅगस्ट रोजी घडली.
वाचवण्यासाठी कर्मचारी जिव मुठीत घेतात.मात्र या गंभीर घटने नंतरही वन विभागाचे अधिकारी ईकडे फडकलेच नाही.
शेवरे जवळील कक्ष क्रमांक १५५ मध्ये मोठ्या प्रमाणात वनजमीन काढण्याचे प्रकार सुरू आहेत. येथे वन कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना आबला वेलजी पावरा (५५) हा वृक्ष तोड करताना दिसला. वनमजुराने त्याला जबर मारहाण केली. यावेळी ते सोडण्यासाठी भायसा जाड्या पावरा (४०) हा गेला असता त्यालाही मारहाण केल्याचे आदिवासींनी सांगीतले. घटनेनंतर जखमी वृद्ध घरी गेल्यावर ही वार्ता गावात समजली. संतप्त होऊन शेकडो आदिवासी महिला-पुरूष वनात गेले. तिथे गस्त घालत असलेले इतर दोन कर्मचारी हैदर तडवी व राजेंद्र गौतम सोनवणे यांना गावात बोलवत ग्रामस्थांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मारहाण करणाºया कर्मचाºयांना येथे आणा तरच यांना सोडू, अशी भूमिका घेतली. तब्बल तीन तास त्यांना डांबून ठेवले. मात्र येथे एकही वन अधिकारी आले नाहीत. शेवटी परीसरातील काही ग्रामस्यांनी संतप्त आदिवासी बांधवांची समजूत घालत आधी जखमींना रूग्णालयात पाठवले. नंतर डांबलेल्या कर्मचाºयांना बाहेर काढत वरगव्हाणकडे रवाना केले. यानंतर शेकडो आदिवासी अडावद ठाण्यात गेले. मात्र तेथे काही प्रतिष्ठीत व्यक्तींच्या मध्यस्थीने समझोता झाल्याने गुन्हा दाखल झाला नाही.
सदर जंगलात मात्र दिवसेंदिवस अतिक्रमण काढण्याच्या घटना घडत असतानाही त्या थांबवण्यात वनविभागाला अपयश येत आहे.




वन अधिकारी फिरकलेच नाहीत...
मारहाणीच्या घटनेनंतर येथे संतप्त महिला-पुरूषांनी वन कर्मचारी हैदर तडवी व गौतम सोनवणे यांना डांबून ठेवले होते. भेदरलेले कर्मचारी तब्बल तीन तास आदिवासींच्या ताब्यात होते. ही गंभीर घटना वरिष्ठांना कळवल्यानंतरसुद्धा कोणत्याही अधिकाºयाने येथे येण्याची तसदी घेतली नाही.


मी घटनेबाबत वनपाल घोडे यांच्याशी बोललो आहे. मात्र कर्मचारी डांबल्याची काही घटनाच घडली नसल्याचे सहायक उपवन संरक्षक वसंत पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र तब्बल तीन तास कर्मचारी डांबून ठेवल्याची गंभीर घटना घडूनही वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ होते हे विशेष.

 

Web Title: The tribals dumped forest workers for three hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.