छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:30 AM2021-02-21T04:30:12+5:302021-02-21T04:30:12+5:30
जळगाव : शिवजयंतीनिमित्त विविध शाळा, महाविद्यालय, संस्था व शासकीय कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना छत्रपती ...
जळगाव : शिवजयंतीनिमित्त विविध शाळा, महाविद्यालय, संस्था व शासकीय कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याविषयी ऑनलाइन माहिती देण्यात आली.
जिल्हा परिषद जळगाव
जिल्हा परिषदेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी जि.प. अध्यक्षा रंजना पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन, शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे, कार्यकारी अभियंता नंदू पवार आदी उपस्थित होते.
चांदसरकर विद्यामंदिर
खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै.गिरीजाबाई नथ्थू शेठ चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्या मंदिरात मुख्याध्यापक श्याम ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याबद्दल ऑनलाइन माहिती दिली. जयश्री पाटील, स्वप्नील भोकरे, महेश तायडे, भूषण अमृतकर यांनी परिश्रम घेतले.
कास्ट्राईब महासंघ
कास्ट्राई कर्मचारी महासंघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र तायडे, जि.प. कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष पुलकेशी केदार, बापू साळुंके, कार्याध्यक्ष साधना बाविस्कर, सचिव ब्रह्मानंद तायडे, उपाध्यक्ष मिलिंद वाल्हे, कोषाध्यक्ष प्रा. प्रमोद लोंढे, नितीन सोनवणे आदी उपस्थित होते.
रघुनाथ काळे विद्यामंदिर
ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रघुनाथ सोमा काळे प्राथमिक विद्यामंदिरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. मुख्याध्यापिका देवयानी कोलते यांनी आयोजन केले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. मिलिंद वाघुळदे यांनी सूत्रसंचालन केले. सोपान भारुडे, संगीता चव्हाण, मिलिंद महाजन, विवेक फेगडे आदी उपस्थित होते.
नंदिनीबाई विद्यालय
नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व ज्यु. कॉलेज येथे शालेय समन्वयक चंद्रकांत भंडारी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्या चारुलता पाटील, उपप्राचार्य एन. व्ही. महाजन, ज्यु कॉलेजच्या उपप्राचार्या एस. एस. नेमाडे, पर्यवेक्षक एस. के. चोपडे, पी. व्ही. वाणी आदींनी पूजन केले. रोशनी सरोदे, खुशी मराठे, मयुरी जोशी, वेदश्री चौधरी, भाग्यश्री हिरे, रूपाली पाटील या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. एच.डी. नेमाडे, व्ही.बी. झोपे, एस.डी. चौधरी, डी.यू. राठोड, जे.आर. नेमाडे, बी.व्ही. बेलदार, ए.वाय. साळुंखे, एस.पी. तायडे यांनी नियोजन केले.
अपंग कल्याण संस्था
जळगाव : अपंग सेवा मंडळ संचलित मूकबधिर विद्यालयात अपंग कल्याण बहुद्देशीय संस्थेतर्फे अध्यक्ष सुनील माळी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना अल्पोपाहार देण्यात आला. मुख्याध्यापक एकनाथ पवार, विशेष शिक्षक गणेश पाटील, किशोर नेवे, जितेंद्र पाटील, राजेंद्र वाणी, संतराम एकशिंगे, दत्तू भदाणे, रवींद्र शिंदे, आशा पाटील, मनीषा दळवी, संगीता प्रजापत आदी उपस्थित होते.