कोपर्डी घटनेप्रकरणी लोकसंघर्ष मार्चोतर्फे श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:19 AM2021-07-14T04:19:08+5:302021-07-14T04:19:08+5:30
शालेय विद्यार्थांना साहित्य वाटप जळगाव : राष्ट्रीय दलित पँथरच्या वर्धापन दिना निमित्त येथील मिराई लॉन येथे गरजू ...
शालेय विद्यार्थांना साहित्य वाटप
जळगाव : राष्ट्रीय दलित पँथरच्या वर्धापन दिना निमित्त येथील मिराई लॉन येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुदाम सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष राजू तायडे, प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली हेरोडे, महानगराध्यक्ष संजय निकम, आरपीआयचे महानगराध्यक्ष मिलिंद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष मोहन अढंगे, दादाराव हेरोळे, तालुका अध्यक्ष श्रावण सोनवणे, विलास बोरिकर, तालुकाध्यक्ष सुनील रायमोळे, प्रतिभा सोनवणे, संगीता मोरे, बन्सीलाल राजपूत, भगवान पाटील, अनिल अढंगे, मिलिंद भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
इकरा महाविद्यालयात गुणवंताचा सत्कार
जळगाव : येथील इकरा अध्यापक विद्यालयात बीएडच्या गुणवत्ता यादीत आलेल्या तकदीस फतिमा शेख गुलाब व शादमान जफर या विद्यार्थांचा शाळेतील शिक्षकांच्या हस्ते मंगळवारी सत्कार करण्यात आला. तसेच प्रा.डॉ.ईश्वर सोनगरे यांनी नुकतीच पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल त्याचांही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य ईरफान ईकबाल शेख यांनी बीएडच्या प्रथम व द्धितीय वर्षाच्या अभ्यासक्रमावर पुस्तक लिहिल्याबद्दल त्याचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
डाक विभागातर्फे पॉलीसी एजंटच्या भरतीचे आयोजन
जळगाव : भारतीय डाक विभागातर्फे टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेच्या पॉलिसीसाठी एजंट यांची थेट भरती करण्यात येणार आहे. यासाठी १०, १२ वी पास झालेले १८ ते ६० वयोगटातील उमेदवार पात्र ठरणार आहेत. उमेदवारांची निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी २३ जुलै पर्यंत डाक अधिक्षक कार्यालय जळगाव येथे रजिस्टर पोस्टाने अर्ज करण्याचे आवाहन डाक विभागाने केले आहे. तसेच अर्जाचा नमुना हा डाक अधिक्षक कार्यालयात उपलब्ध असल्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
गोरखपुर साप्ताहिक एक्सप्रेसला मुदतवाढ
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे लोकमान्य टिळक ते गोरखपुर दरम्यान सुरू असलेल्या गाडीला ६ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच मुदतवाढ देण्या बरोबर तिकीट आरक्षण करूनच प्रवास करण्याचे सक्ती कायम ठेवण्यात आली आहे. तरी प्रवाशांनी या गाडीचा लाभ घेण्याचे आवाहन भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.