टँकरवर दीड कोटी खर्च, तरीही जळगावकर तहानलेलेच

By विलास.बारी | Published: September 27, 2017 05:54 PM2017-09-27T17:54:17+5:302017-09-27T18:00:57+5:30

जळगाव जिल्ह्यात ३६ गावांना होतोय टँकरने पाणीपुरवठा. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात टँकरवर ३० लाखांचा खर्च

Tricolor costs 1.5 crores, yet Jalgaon is thirsty | टँकरवर दीड कोटी खर्च, तरीही जळगावकर तहानलेलेच

टँकरवर दीड कोटी खर्च, तरीही जळगावकर तहानलेलेच

Next
ठळक मुद्देजलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात टँकरवर ३० लाखांचा खर्चनिधीअभावी तात्पुरत्या पाणी योजनांची कामे उधारीवरसध्या ३६ गावांमध्ये १८ टँकरद्वारे पाणीपुरवठाआठ तालुक्यात टँकरवर एक कोटी ५४ लाख ३८ हजार २८६ रुपयांचा खर्च

विलास बारी / आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२७ : अनियमित पाऊस, गावातील जलस्त्रोताची बिकट स्थिती आणि पाणी योजनांच्या कामातील अनियमितता यामुळे जळगाव जिल्ह्यातील बहुतांश गावांना पाणी टंचाई पाचवीला पुजलेली आहे. पावसाळा संपत आला असताना ३६ गावांमध्ये १८ टँकर आहे. ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेतर्फे या वर्षभरात टँकरवर एक कोटी ५४ लाख ३८ हजार २८६ रुपयांचा खर्च होऊनही जळगावकर तहानलेलेच आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात टँकरवर ३० लाखांचा खर्च झाला आहे.
७ कोटी ३५ लाखांचा टंचाई आराखडा
जिल्हा प्रशासनातर्फे सन २०१६/१७ या वर्षाचा टंचाई आराखडा घोषित करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील दुष्काळी गावांमध्ये तात्पुरत्या पाणी योजना, खाजगी विहिर अधिग्रहण तसेच विंधन विहिर ताब्यात घेण्यासाठी सात कोटी ३५ लाख ५ हजार रुपयांच्या संभाव्य टंचाई आराखड्याचे नियोजन करण्यात आले.
समाधानकारक पावसाअभावी टँकर कायम
गेल्यावर्षाच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात सरासरी कमी पाऊस झाल्याने अमळनेर, जामनेर, पारोळा, जळगाव, बोदवड व भुसावळ तालुक्यातील गावांमध्ये टंचाई कायम आहे. या तालुक्यांमध्ये सध्या ३६ गावांमध्ये १८ टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाळा संपत आला असताना देखील या गावांमध्ये टँकर सुरु आहे.
टँकरवर दीड कोटींचा खर्च
जिल्हा प्रशासनातर्फे अमळनेर, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा या आठ तालुक्यांमध्ये उन्हाळ्यात टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा करण्यात आला. जिल्हा प्रशासनातर्फे ७ सप्टेंबर २०१७ पर्यंत आठ तालुक्यात टँकरवर एक कोटी ५४ लाख ३८ हजार २८६ रुपयांचा खर्च आतापर्यंत करण्यात आला आहे. त्यात ९४ हजार ४०० रुपये खाजगी विहिर अधिग्रहणावर खर्च झाला आहे.
तात्पुरत्या पाणी योजनांची कामे उधारीवर
पाणी टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडून संबंधित ग्रामपंचायतींकडून तात्पुरत्या पाणी योजनेचे प्रस्ताव मागविण्यात येत असतात. त्यानुसार ११ गावातील तात्पुरत्या योजनांसाठी ७४ लाख ७४ हजार ३९५ रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. मात्र या योजनांसाठी रक्कम प्राप्त न झाल्याने ही कामे सध्यातरी उधारीवर सुरु आहेत. यासोबतच आडवे बोअर, विहीर खोलीकरण, न.पा. विशेष दुरुस्ती योजना, विंधन विहीर, कूपनलिका घेणे यासाठी शासनाकडून निधी मिळालेला नाही.








 

Web Title: Tricolor costs 1.5 crores, yet Jalgaon is thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.