दर्शनाला आलेल्या भाविकांच्या दुचाकी चोरणारे त्रिकूट जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:12 AM2021-06-29T04:12:40+5:302021-06-29T04:12:40+5:30
दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी व स्थानिक गुन्हे ...
दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी व स्थानिक गुन्हे शाखेला फैलावर घेत गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. पोलीस ठाणे पातळीवर दुचाकी चोरीचे गुन्हे स्वतंत्र अंमलदारांकडे देण्याच्याही सूचना डॉ. मुंढे यांनी दिलेल्या आहेत. दरम्यान, पिंप्री खुर्द, ता. धरणगाव येथील अजय मोरे हा तरुण एरंडोल तालुक्यात पद्मालय येथे देवदर्शनाला आलेल्या भाविकांच्या दुचाकी चोरी करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक फौजदार अशोक महाजन, प्रदीप पाटील, दादाभाऊ पाटील, नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, सचिन महाजन, अशोक पाटील व मुरलीधर बारी यांच्या पथकाने संशयित मोरे याचा शोध घेत त्याच्यावर पाळत ठेवली. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याने पद्मालय येथून दुचाकी चोरी केल्याचे मान्य करून आणखी कल्पेश व नामदेव या दोघांची नावे सांगितली. त्यामुळे पथकाने मोरे याला सोबत घेऊन इतर दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, या तिघांनी आणखी दुचाकी केल्याचा संशय असून पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.
सोयगावचा तरुणही जाळ्यात (फोटो ९)
जामनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या अतुल संजय इंगळे (२५, रा.गलवाडे, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) यालाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. त्याच्याकडूनही दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याला जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.