बारावीच्या निकालासाठी 'त्रिसुत्री'चा स्वीकार करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:11 AM2021-06-23T04:11:57+5:302021-06-23T04:11:57+5:30
जळगाव : शासनाने इयत्ता बारावीचे मूल्यांकन व निकालाची त्रिसूत्री ठरवीत असताना इयत्ता दहावीच्या गुणवत्तेला फारसे महत्त्व दिले नाही. त्यामुळे ...
जळगाव : शासनाने इयत्ता बारावीचे मूल्यांकन व निकालाची त्रिसूत्री ठरवीत असताना इयत्ता दहावीच्या गुणवत्तेला फारसे महत्त्व दिले नाही. त्यामुळे सीबीएससी पॅटर्न प्रमाणे इयत्ता बारावीचे गुणदान करत असताना इयत्ता दहावीचे तीस टक्के, इयत्ता अकरावीचे तीस टक्के व इयत्ता बारावीचे अंतर्गत मूल्यमापनाचे ४० टक्के ही त्रिसूत्री महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने व राज्य परीक्षा महामंडळाने स्वीकारावी, अशी मागणी कनिष्ठ प्राध्यापक संघटनेच्यावतीन करण्यात आली आहे़
जवळपास सोळा महिने झालेत विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत असून कुठेही वर्गात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले नाही. खाजगी शिकवणी वर्ग देखील बंद आहेत. काही ठिकाणी अकरावीच्या परीक्षा देखील झालेल्या नाहीत. त्यातच अकरावी व बारावीचे अंतर्गत मूल्यमापन आता एकत्र केले जाणार आहेत. अशा परिस्थितीत अनेक विद्यार्थ्यांच्या एकूण गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी विद्यार्थ्यांची गुणदान करताना इयत्ता दहावीला बेस म्हणून बारावीचे गुणदान केले जावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदनावर जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुनील सोनार, सरचिटणीस प्रा.शैलेश राणे, कार्याध्यक्ष प्रा.नंदन वळींकार, प्रा.सुनील पाटील, उपाध्यक्ष प्रा अतुल इंगळे, प्रा.संजय पाटील प्रा.पी.पी. पाटील, प्रा.गजानन वंजारी, प्रा. सुनील गरुड प्रा डी.डी. पाटील आदींच्या स्वाक्ष-या आहेत.