मोटारसायकलला जोडली ट्रॉली, शिक्षक मुलांना शाळेत नेतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 09:27 AM2022-04-04T09:27:04+5:302022-04-04T09:27:22+5:30

Deshi jugad News: आधी कोरोनामुळे बस बंद, आता कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद, यामुळे  विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यावर टेहू येथील आयटीआयचे शिक्षक एम. व्ही. पाटील  यांनी उपाय शोधून काढला आहे.

Trolley attached to motorcycle, teachers take children to school ... | मोटारसायकलला जोडली ट्रॉली, शिक्षक मुलांना शाळेत नेतात...

मोटारसायकलला जोडली ट्रॉली, शिक्षक मुलांना शाळेत नेतात...

googlenewsNext

- शरद पाटील 
पारोळा (जि. जळगाव) : आधी कोरोनामुळे बस बंद, आता कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद, यामुळे  विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यावर टेहू येथील आयटीआयचे शिक्षक एम. व्ही. पाटील  यांनी उपाय शोधून काढला आहे. आपल्या मोटारसायकलला ट्रॉली जोडून ते विनामूल्य विद्यार्थ्यांना शाळेत नेतात. 
बस बंदमुळे शहरी भागात शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ज्या पालकांकडे वाहन आहे,  ते मुलांना शाळेत नियमित पाठविण्याचा प्रयत्न करतात. शिक्षक पाटील  हे दगडीसबगव्हाण ते टेहू रोज मोटारसायकलने प्रवास करतात.  त्यांना  वाहनाची वाट पाहणारे अनेक विद्यार्थी रस्त्याच्या कडेला उभे असलेले दिसायचे. ते पाहून पाटील यांना कल्पना सुचली. त्यांनी १० क्विंटल वजन ओढू शकेल, अशी चार टायरची ट्रॉली बनविली आणि ती मोटारसायकलला जोडली. 
शाळा उघडल्यापासून ते रोज १० ते १२ विद्यार्थ्यांना या ट्रॉलीत बसवून पारोळा येथे शिकवणी व शाळेच्या कामासाठी सोडतात. संध्याकाळी जाताना त्यांना परत घेऊन जातात. दगडीसबगव्हाण गाव हे पारोळा-धरणगाव रस्त्यावर ५ किमी आतमध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतर वाहन मिळणेही अवघड असते. या स्थितीत पाटील यांनी बनवलेली ट्रॉली त्यांना शिक्षणासाठी वरदान ठरली आहे. 

समाजातील इतर बांधवांनीही रस्त्यावर वाहनाची वाट बघत असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या वाहनावर जागा देऊन सहकार्य करावे. म्हणजे त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. 
- एम. व्ही. पाटील, शिक्षक

Web Title: Trolley attached to motorcycle, teachers take children to school ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.