अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने लाभार्र्थींची होतेय अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 08:52 PM2019-01-01T20:52:49+5:302019-01-01T20:54:37+5:30

स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या ई-पॉस मशिन यंत्रणेमुळे खऱ्या गरजू लाभार्र्थींना धान्यपुरवठा होत असला तरी त्यात धान्य घेणाºया लाभार्र्थींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Trouble due to benefits due to thumb impression of thumb | अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने लाभार्र्थींची होतेय अडचण

अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने लाभार्र्थींची होतेय अडचण

Next
ठळक मुद्दे‘आधार’ असूनही लाभार्थी ‘निराधार’यावल तालुक्यातील न्हावीसह परिसरातील स्थिती

न्हावी, ता.यावल, जि.जळगाव : स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या ई-पॉस मशिन यंत्रणेमुळे खऱ्या गरजू लाभार्र्थींना धान्यपुरवठा होत असला तरी त्यात धान्य घेणाºया लाभार्र्थींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
ई-पॉस हे इंटरनेटला संलग्न असल्याने रेशन दुकानदार व कार्डधारक याची संपूर्ण माहिती पोर्टलवर उपलब्ध असून, कार्डधारकाने खरेदी केलेल्या संपूर्ण धान्याचा तपशील विभागाच्या पोर्टलवर तत्काळ येतो. परंतु धान्य घेण्यास गेलेल्या लाभार्र्थींचे ठसे उमटत नसल्या कारणाने चकरा माराव्या लागत आहे. सध्या सर्वच रेशनकार्डधारक लाभार्थीची पडताळणी सुरू आहे. परिवारातील प्रत्येक लाभार्र्थींचे ई-पॉस मशिनवर ठसे घेतले जात असून, त्यावरसुद्धा काहींचे ठसे उमटत आहेत तर काहींचे ठसे उमटत नसल्याकारणाने अडचण निर्माण होत आहे.
तसेच गावातील मजुरीच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेले लाभार्थी ठसे देण्यासाठी आले असल्याने त्यांचेसुद्धा काहींचे ठसे उमटत नसल्याकारणाने आपल्याला मिळणारे धान्य बंद तर होणार नाही ना, अशी भीती सध्या कार्डधारकांमध्ये व्यक्त होताना दिसून येत आहे. यासाठी शासनाने पर्याय शोधण्याची गरज कार्डधारक लाभार्थीकडून मोठ्या प्रमाणात व्यक्य होत आहे.

Web Title: Trouble due to benefits due to thumb impression of thumb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.