कंपनीत प्रवेश करण्यापूर्वीच ट्रकने दुचाकस्वाराला उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 07:18 PM2019-11-24T19:18:00+5:302019-11-24T19:20:28+5:30
कंपनीत प्रवेश करण्यासाठी महामार्गावरुन वळण घेत असताना भरधाव ट्रकने रवींद्रसिंग फतेसिंग वतपाल (५५, रा.शिवकॉलनी, जळगाव, मुळ रा.साकळी, ता.मलकापूर, जि.बुलडाणा) यांच्या दुचाकीला रविवारी सकाळी पावणे आठ वाजता महामार्गावर जैन इरिगेशन कंपनीसमोर मागून जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वतपाल यांचा दुपारी १ वाजता उपचार घेत असताना मृत्यू झाला.
जळगाव : कंपनीत प्रवेश करण्यासाठी महामार्गावरुन वळण घेत असताना भरधाव ट्रकने रवींद्रसिंग फतेसिंग वतपाल (५५, रा.शिवकॉलनी, जळगाव, मुळ रा.साकळी, ता.मलकापूर, जि.बुलडाणा) यांच्या दुचाकीला रविवारी सकाळी पावणे आठ वाजता महामार्गावर जैन इरिगेशन कंपनीसमोर मागून जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वतपाल यांचा दुपारी १ वाजता उपचार घेत असताना मृत्यू झाला.
वतपाल हे साकळी, ता. मलकापूर येथील मुळ रहिवासी असून पत्नी छाया यांच्यासोबत शिवकॉलनी येथे वास्तव्यास होते. मुलगा सुकेश हा पुण्यात कंपनीत नोकरीला आहे तर मुलगी सायली हिचा विवाह झाला असून ती सुध्दा पुण्यातच सासरी नांदते. छाया या जिल्हा परिषदेच्या चिंचोली शाळेत शिक्षिका आहेत. वतपाल हे २८ वषार्पासून जैन इरिगेशन कंपनीत नोकरीला होते.
रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शिवकॉलनी येथून दुचाकीने (एम.एच. १९ ए.ए.९५०२) कंपनीत जाण्यासाठी निघाले. कंपनीजवळ पोहचले असता महामार्गावरुन कंपनीत प्रवेश करण्यासाठी वळण घेणार तोच मागून पाळधीकडे जात असलेल्या तांदळाच्या भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. हा प्रकार लक्षात येताच कंपनीच्या कर्मचाºयांनी तातडीने धाव घेऊन त्यांना कंपनीच्याच रुग्णवाहिकेने खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथे डॉक्टर उपलब्ध तेथून परत त्यांना दुसºया खासगी दवाखान्यात हलविण्यात आले.तेथे उपचार सुरु असताना दुपारी १.१२ वाजता त्यांची मृत्यूंशी झुंज संपली.
हेल्मेट असतानही गेला जीव
वतपाल हे नियमितप्रमाणे हेल्मेट घालूनच दुचाकीवरुन कंपनीत ये-जा करत होते. रविवारी जात असतांना त्याच्या डोक्यात हेल्मेट होते, मात्र हेल्मेट असतानाही नशिबाने साथ सोडली. अपघातात कमरेला दुखापत होवून वतपाल यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांसह कंपनीच्या कर्मचाºयांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. पत्नी छाया यांचा आक्रोश मन हेलावणारा होता. घटनेची माहिती मुलांना कळविण्यात आली असून ते रात्री उशिरापर्यंत शहरात दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.