ट्रकची धडक; पती ठार, पत्नी व मुलगी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:14 AM2021-05-29T04:14:35+5:302021-05-29T04:14:35+5:30
मुक्ताईनगर : महामार्गावर हरताळा फाट्याजवळ ट्रकने धडक दिल्याने पती जागीच ठार झाला, तर पत्नी व मुलगी जखमी झाली. हा ...
मुक्ताईनगर : महामार्गावर हरताळा फाट्याजवळ ट्रकने धडक दिल्याने पती जागीच ठार झाला, तर पत्नी व मुलगी जखमी झाली. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी सातच्या दरम्यान घडला. अमित प्रल्हाद चौधरी (वय ३६, रा. कोथळी) असे मयताचे नाव आहे.
तालुक्यातील कोथळी येथील रहिवासी असलेले अमित प्रल्हाद चौधरी (वय ३६, रा. कोथळी), त्यांची पत्नी प्रीती व लहान मुलगी लिखिता हे तिघे मोटारसायकलने (क्र. एमएच १५ - एचएफ ९०४८) नाशिककडे जात होते. तेव्हा हरताळा फाट्याजवळ असलेल्या हॉटेल फ्लोरासमोरच अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अमित चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी प्रीती व लिखिता या दोन्ही गंभीर जखमी झाल्या. दोघींना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अमित हे नाशिक येथे प्लम्बिंगचे काम करीत होते. लॉकडाऊनमुळे ते घरी कोथळी येथे आलेले होते.
शुक्रवारी रात्री ते नाशिकला जात होते. जात असतानाच रस्त्यात त्यांचा हा अपघात झाला.
सर्वांशी अतिशय मिळतेजुळते असलेल्या अमित यांच्या मृत्यूमुळे कोथळी गावावर शोककळा पसरली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद श्रीनाथ करीत आहेत.
अमित चौधरी