कन्नड घाटात ट्रक कोसळून चालकाचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 20:16 IST2021-04-17T20:16:21+5:302021-04-17T20:16:58+5:30
कन्नड घाटात ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ‘यू टर्न’वर खोल दरीत ट्रक कोसळून चालकाचा जागीच मृत्यू झाला.

कन्नड घाटात ट्रक कोसळून चालकाचा जागीच मृत्यू
ठळक मुद्देवळणावर ट्रक दरीत कोसळून अपघात.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : कन्नड घाटात ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ‘यू टर्न’वर खोल दरीत ट्रक कोसळून चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.शिवराज मल्लापा (३२, कर्नाटक) असे मयताचे नाव आहे.
औरंगाबादवरून चाळीसगाव मार्गाने मालाने भरलेला ट्रक घेवून येत असताना कन्नड घाटात ही घटना घडली. यात क्लिनर सचिन भिवशा हिरबाव्ही (कर्नाटक) हा जखमी झाला आहे. ग्रामीण पोलीसात सचिन हिरबाव्ही याचे फिर्यादीवरून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पो. हे. कॉ. दिलीप रोकडे करीत आहे.