आळंदीला पाठवणार ट्रकभर पुरणपोळ्या
By admin | Published: March 26, 2017 11:58 PM2017-03-26T23:58:40+5:302017-03-26T23:58:40+5:30
अमळनेर : मंगळग्रह मंदिरात पुरणपोळ्या आणून देण्याचे आवाहन
अमळनेर : आळंदी (देवाची) येथील स्वानंद सुकनिवासी जोग महाराज संस्थापीठ वारकरी शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभरापासून अखंड हरिनाम संकीर्तन सुरू आहे. त्याची सांगता 29 मार्च रोजी होणार आहे. यासाठी देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहणार असून, त्या सर्वाना पुरणपोळीचा महाप्रसाद दिला जाणार आहे.
यासाठी राज्यभरातून पुरणपोळ्या गोळा करून तेथे पाठविल्या जाणार आहेत. अमळनेरातूनही जवळपास एक ट्रकभर पुरणपोळ्या पाठविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी शक्य होतील तितक्या पुरणपोळ्या गुढीपाडव्याला 28 रोजी दुपारी 1 वाजेर्पयत श्री मंगळदेव ग्रह मंदिर येथे आणून द्याव्यात, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान, जमा केलेल्या सर्व पुरणपोळ्या सुरक्षित रहाव्यात यासाठी त्यांना विशेष प्रकारे आवरण लावण्यात येणार आहे.
जमा झालेल्या पुरणपोळ्या घेऊन मिनीट्रक आळंदी (देवाची)कडे रवाना होईल. रात्री हा ट्रक आळंदीला पोहचेल.
धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात शेकडो वर्षापासून वारकरी संप्रदायाचा सिंहाचा वाटा आहे. आळंदी (देवाची) येथे होत असलेल्या त्यांच्या कार्यक्रमात खारीचा वाटा उचलण्याचा श्री मंगळग्रह मंदिराचा प्रय} आहे. भाविकांनी जास्तीत जास्त पुरणपोळ्या जमा कराव्यात.
-डिगंबर महाले,
अध्यक्ष, श्री मंगळ सेवा संस्थान.