रावेरजवळ बसला ट्रकची जबर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 02:17 AM2019-02-02T02:17:47+5:302019-02-02T02:20:13+5:30

ट्रकने संगमनेर- रावेर या रातराणी बसला जोरदार धडक दिल्याने त्यात बसचालकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास रावेरनजीक घडला.

 A truck rammed into a truck near Raver | रावेरजवळ बसला ट्रकची जबर धडक

रावेरजवळ बसला ट्रकची जबर धडक

Next
ठळक मुद्देबसचालकासह एक प्रवासी जखमीभल्या पहाटे रावेरजवळ घडला अपघात

रावेर : मालवाहू ट्रकने संगमनेर- रावेर या रातराणी बसला जोरदार धडक दिल्याने त्यात बसचालकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास रावेरनजीक घडला.
सावद्याकडे जाणाऱ्या ट्रकचे (क्र. एच एन. ३८/टी - ००४२) रस्त्यातील खड्डा चुकवतांना टायर फुटल्याने सावद्याहून रावेरकडे येत असलेल्या संगमनेर -रावेर रातराणी एस. टी. बसला (क्र. एम.एच - ४०/एन - ९०३८) चालक बाजूने जबर धडक दिल्याने बस चालक राजू हौसाजी आर्सुलवार (४०) रा. रावेर यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर होऊन ते गंभीर जखमी झाले. तर एक प्रवासी किरकोळ जखमी झाला असून दोघांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
हा अपघात रावेर शहरालगत सावदा रस्त्यावरील श्री बिजासन माता मंदिरासमोर घडला. याप्रकरणी रावेर पोलिसात पसार झालेल्या ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद - जळगाव महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असल्याने तब्बल दोन तास उशीराने धावणारी संगमनेर - रावेर बस ही सावद्याहून रावेरकडे येत असतांना विरूद्ध दिशेने आलेल्या ट्रकने समोरील एक टायर फुटल्याने खड्डा चुकवतांना बसला जोरदार धडक दिली. त्यात बसचालकाच्या सीटसह पाठीमागील दुसºया क्रमांकाच्या प्रवासी सीटपर्यंत बसचा चुराडा झाला आहे. सुदैवाने जिवीतहानी टळली मात्र बसचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या पाठीमागील सीटवरील प्रवासी शेख मुजाहीद शेख नुरमोहंम्मद (२२) रा. रावेर हा किरकोळ जखमी झाला आहे.
बसवाहक भिमसिंग राठोड यांनी रावेर आगार व्यवस्थापक सतीश बंदरे व रावेर पोलीसात खबर दिल्याने पोलीस व बस आगारातील यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत रस्त्यावरील वाहनचालक व लगतच्या हॉटेलवरील कामगार तथा प्रवाशांनी कॅबिनमध्ये अडकलेल्या चालकास व प्रवाशाला बाहेर काढून रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवले. त्यांचेवर प्राथमिक उपचार करून शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र चालकाची गंभीर स्थिती पाहून त्याला जळगावला हलविण्यात आले आहे. याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title:  A truck rammed into a truck near Raver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.