ट्रक - खाजगी बसच्या धडकेत तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 10:47 AM2019-02-13T10:47:11+5:302019-02-13T10:47:28+5:30
मृतांमध्ये दोन्ही चालकांचा समावेश
जळगाव/नशिराबाद : जळगाव -भुसावळ महामार्गावर खाजगी आराम बस बस व ट्रकची समोरासमोर धडक होवून दोन्ही वाहनांच्या चालकासह तीन जण ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे दोन वाजता नशिराबादजवळील कपूर पेट्रोल पंपासमोर घडली. या अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजुकडील वाहतूक चार तास खोळंबली होती. तब्बल तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. महामार्ग चौपदरीकरणासाठी मोऱ्यांचे बांधकाम व अरुंद रस्ता या अपघाताला कारणीभूत ठरला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एक खासगी कंपनीची ट्रॅव्हल्स बस (क्र. जी.जे. १९ एक्स ९५९६)) ही यवतमाळहून सुरतकडे जात होती तर ट्रक (क्र.जी.जे.१२ बी.टी.२५९९) हा गुजरातमधून अमरावतीकडे जात होता.त्यात लोखंडी पाईप भरेलेले होते. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्यासह कर्मचाºयांनी घटनास्थळाकडे धाव घेतले. व रुग्णवाहिकेतून मयत तसेच जखमींना रुग्णालयता हलविले. अपघात एवढा जोरदार होता की ट्रक व ट्रॅव्हल्सचा चक्काचूर आहे. सकाळी अपघातग्रस्त वाहने रस्त्यातच असल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या.
मृतांमध्ये ट्रक चालक राजाराम गेनाराम चौधरी ( २६, रा. बावडी ता.चौटल जि.बारमेर, राजस्थान), निर्भयसिंग प्रतापसिंग कंवर (३९, रा पलासिया ता.जाडोन, जि.उदयपूर, राजस्थान) व आराम बसचा चालक शंकर भय्याजी पटेल (वय ३७, रा.हिमला, ता.माऊली जि.उदयपूर, राजस्थान) यांचा समावेश आहे. कंवर याचा डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान सकाळी १०.३० वाजता मृत्यू झाला.
अपघातात ट्रॅव्हल्समधील विनोद राठोड (रा.भांबोरा ता.घाटंजी, यवतमाळ), राधा विनोद राठोड (३०), पूजा विनोद राठोड, नारायण विनायक तांबोळे ( ४५), गजानन चावके (रा.दिग्रस, यवतमाळ), संतोष अग्निहोत्री, (दोघे रा.रा.दिग्रस, यवतमाळ), ट्रॅव्हल्समधील वाहक अतिष पवार (३८, रा.खामगाव, जि.बुलडाणा) आदी जखमी झाले असून त्यांच्यावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इतर जखमींना इतरत्र हलविण्यात आल्याने त्यांची नावे मिळू शकलेली नाही.
दोन्ही वाहनांच्या कॅबीनचा चुराडा
हा अपघात इतका भीषण होता कि ट्रक व आराम बसच्या कॅबीनचा अक्षरश: चुराडा झाला. अडकलेले मृतदेह बाहेर काढताना प्रचंड कसरत करावी लागली. क्रेन मागवून वाहने इतरत्र हलवून जखमींना जवळच्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. पहाटे पाच वाजेपर्यंत जखमींना दवाखान्यात इतरत्र हलविण्याचे काम सुरु होते.
प्रवाशी गाढ झोपेत अन् हाहाकार... बस व ट्रक समोरासमोर धडकल्यानंतर या अपघाताचा मोठा आवाज झाला. बसमध्ये महिला, पुरूष व काही बालके होती. रात्रीच्या वेळी अचानक झालेल्या या अपघातामुळे बसमधील प्रवाशांचा एकच आक्रोश सुरू होता. यावेळी कपूर पेट्रोलपंपावरील कर्मचारी मोहन रणधीर, ज्ञानेश्वर मुळे तसेच हॉटेलवरील कर्मचाºयांनी धाव घेऊन मदत केली. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक सचिन बागुल, उपनिरीक्षक गणेश हिवरकर, युनुस शेख, राजेश साळुंखे, किरण हिवराळे, सतीश पाटील, रवींद्र इधाटे, हसमत सय्यद, नामदेव ठाकरे, अमोल पाटील, व किरण बाविस्कर यांनी तातडीने घटनास्थळ गाठून मदतकार्य केले. ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले.