अपयशाने खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 05:35 PM2019-09-28T17:35:42+5:302019-09-28T17:36:52+5:30
पिनॅकल स्पर्धेचे समारोप : प्रा. ए.बी.चौधरी यांचे प्रतिपादन
जळगाव- अपयश हीच यशाची पहिली पायरी मानावी. अपयशाने खचून न जाता आपण पुन्हा प्रयत्न केल्यास पहिल्यापेक्षा जास्त किंबहुना अधिक असे उज्ज्वल यश मिळेल, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विज्ञान अधिष्ठाता प्रा. ए. बी. चौधरी यांनी केले.
रायसोनी महाविद्यालया सुरू असलेल्या पिनॅकल स्पर्धेचा समारोप शुक्रवारी झाला़ त्याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, शरद मोरे, बाबा मलिक, प्रा.रफिक शेख तसेच प्रा. कल्याणी नेवे आदींची उपस्थिती होती़ दोन दिवसीय सुरु असलेल्या माहिती व तंत्रज्ञानावर आधारित पिनॅकलया आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रश्नमंजुषा, संशोधन पेपर सादरीकरण, मनोरंजन व एकाग्रता वाढविण्यासाठी संगणक गेमिंग, पोस्टर्स प्रेझेंटेशन, सीप्लसप्लस प्रोग्रामिंग स्पर्धा पार पडल्यात. यात आयटी क्विज १२००, गेमिंग ६०, संशोधन पेपर ६०, पोस्टर्स प्रेझेंटेशन १५० व सीप्लसप्लस प्रोग्रामिंग मध्ये ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. संशोधन विषयात जीएसटी, डिजिटल इंडिया, कॅशलेस सोसायटी, जिओ प्रभाव, आयओटी या प्रमुख विषयांसह आदी विषय सादर करण्यात आलेत. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राज कांकरिया व राधिका वर्मा यांनी केले तर आभार प्रा. कल्याणी नेवे यांनी मानले.
यांनी पटकाविले पारितोषिक
आयटी क्विझ या स्पर्धेत प्रथम- मेहुल पाटील, भावेश कुवर, द्वितीय- यश कळसकर, पराग पाटील, तृतीय- निकिता वराडे, मोहिनी इंगळे, एन.एफ.एस.गेमिंगमध्ये प्रथम- शिवम लीबारे, द्वितीय-तुषार बारी, एमएम गेमिंगमध्ये प्रथम सय्यद झुबेर, फैझल मलिक, मुजताबा आहेरार, शिवम कुलकर्णी, द्वितीय- जालीस कुरेशी, सलमान खान, साहिल खाटिक, शादाब खान, सीएस गेमिंगमध्ये प्रथम ऋषभ कोटेचा, अक्षय देशमुख, चेतन देशमुख, कुणाल बोबडे, मिहीर अडवाणी, द्वितीय-यश पाटील, तेजस बागुल, संदेश आर्य, संजन दारा, ऋतिक वालेचा, पेपर प्रेझेन्टेशनमध्ये पदवी स्तरावर प्रथम- दानिश शेख, व्दितीय रुचिका बोरसे, उमा रामरख्या, तृतीय- नीरज पवार, मुनाझा शेख, रोशनी खान, पदव्युत्तर स्तरावर प्रथम- पियुष हासवाणी, सोमीनाथ गुंडाळे, पोस्टर प्रेझेटेशनमध्ये पदवी स्तरावर प्रथम- कोमल राजांनी, शिवानी वानखेडे, द्वितीय- अरुणा मेत्री, तृतीय खान मदिना, शेख मीना, पदव्युत्तर स्तरावर प्रथम- विशाल वाधवानी, जान्हवी पाटील, दीपश्री महाजन, सी. प्लस. प्लसमध्ये पदवी स्तरावर प्रथम- यदनेष वाणी, द्वितीय- पवन सोनार, तृतीय- आवेश लोहार, पदव्युत्तर स्तरावर प्रथम क्रमांक रजत सिंग याने पटकाविला़ या विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम या प्रमाणे परितोषिक देऊन गौरविण्यात आले़