अस्तीत्व शाबूत ठेवण्यासाठी खडसेचे केविलवाणे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:17 PM2018-06-24T22:17:38+5:302018-06-24T22:21:04+5:30
अंजली दमानिया यांचा आरोप
Next
ठळक मुद्देउद्योग नसल्याने रोज प्रसिद्धी माध्यमांपुढे येतातइतर कोणत्याही अधिका:यास तपास देण्याची मागणी
ज गाव- सध्या काही उद्योग नसल्याने एकनाथराव खडसे हे रोज उगाच उठून प्रसिद्धी माध्यमांपुढे आपलं अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी एक केविलवाणा प्रय} करतांना दिसत आहेत, असे मत सामाजिक कार्यकत्र्या अंजली दमानिया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. याचबरोबर एफआयआरमध्ये तपासी अधिकारी बदल्याच्या आरोपाचे खंडण करताना दमानिया यांनी म्हटले आहे की, सरकार आणि सत्ताही त्यांची असताना माङया दबावाने तपासी अधिकारी बदलल्याचा आरोपच खोटा आहे.भाजपा नेते एकनाथराव खडसे यांनी जळगाव येथे पत्रपरिषदेत अंजली दमानियांवर आरोप केले होते. यावेळी त्यांनी म्हटले की, अंजली दमानिया यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात दाखल तक्रारीत चौकशी अधिकारी हा दमानिया यांच्या मागणीवरुन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बदलला असून कराळे हे कोणाच्या तरी दबावात किंवा आर्थिक व्यवहारामुळे नियमबाह्य काम करीत आहे. इतर कोणत्याही अधिका:यास तपास देण्याची मागणीया आरोपाचे खंडण दमानिया यांनी केले असून तपासी अधिकारी कडलग यांच्या विरुद्ध मागील एका केस मध्ये मी चौकशीची मागीण केली होती. आणि त्याच अधिका:याकडे दुस:या केसची तपास अधिकारी म्हणून जबाबदारी देणे योग्य नाही, यामुळे इतर कोणत्याही अधिका:याला ती जबाबदारी द्यावी, मी अशी मागणी केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.