वर्चस्व सहन होत नसल्याने आपल्याला दाबण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:13 AM2021-06-20T04:13:21+5:302021-06-20T04:13:21+5:30

पारोळा : जिल्ह्यात काही जणांना आपले वर्चस्व सहन होत नाही, म्हणून आपल्याला दाबण्याचा प्रयत्न होत आहे, जिल्ह्यात ...

Trying to suppress you because dominance is not tolerated | वर्चस्व सहन होत नसल्याने आपल्याला दाबण्याचा प्रयत्न

वर्चस्व सहन होत नसल्याने आपल्याला दाबण्याचा प्रयत्न

Next

पारोळा : जिल्ह्यात काही जणांना आपले वर्चस्व सहन होत नाही, म्हणून आपल्याला दाबण्याचा प्रयत्न होत आहे, जिल्ह्यात अशा कितीही कुरघोड्या झाल्या तरी त्याला भीत नाही, असा टोला शिवसेना आमदार चिमणराव पाटील यांनी कुणाचेही नाव न घेता स्वकीय आणि विरोधकांनाही मारला आहे.

पारोळा बाजार समितीच्या आवारात शनिवारी सकाळी शिवसेना स्थापनादिनाचा कार्यक्रम झाला. यात आमदार चिमणराव पाटील बोलत होते. जिल्ह्यातील शिवसेनेत संघटनात्मक बदल करण्यात आले. यात आमदार पाटील यांच्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याची चर्चा होती. याविषयी त्यांनी बरेच दिवस मौन पाळले. आज त्यांनी आपल्या मनातील भावनेला वाट करून दिल्याचे म्हटले जात आहे.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, बाजार समिती सभापती अमोल पाटील, जि.प. सदस्य रोहिदास पाटील, शेतकरी संघाचे माजी चेअरमन चतुर पाटील, जि.प.चे माजी सभापती दिनकर पाटील, उपसभापती दगडू पाटील, पंचायत समिती सदस्य जितेंद्र पाटील, भिडू जाधव, शेतकरी संघ चेअरमन अरुण पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख आर.बी.पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले की, शिवसेनेनेसारखं संघटन हे जगात कुठेही नाही. गेली पन्नास वर्षे एक नेता,एक वक्ता, एक संघटना ही व्याख्या जगात कुठल्याच राजकीय पक्षात नाही. सध्या राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या साडेतीन वर्षात आपण मतदारसंघात कुठलीही कामे बाकी ठेवणार नाही. आपण सत्तेत आहोत, त्यामुळे कुरघोड्या करणाऱ्यांकडे लक्ष न देता मतदार संघात विकासालाच प्राधान्य देऊ. मजबूत कार्यकर्ते आहेत त्यांच्या भरवश्यावर आपण निवडणूक लढवत आलो आहोत.

Web Title: Trying to suppress you because dominance is not tolerated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.