संजय गांधी अनुदान समिती अध्यक्षपदी तुकाराम बोरोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:13 AM2021-05-31T04:13:42+5:302021-05-31T04:13:42+5:30
या समितीत मागासवर्गीय अशासकीय प्रतिनिधी म्हणून काँग्रेसचे राजीव सवर्णे, महिला अशासकीय प्रतिनिधी म्हणून रा.काँ.च्या उज्ज्वला नीळकंठ चौधरी, इतर मागासवर्गीय ...
या समितीत मागासवर्गीय अशासकीय प्रतिनिधी म्हणून काँग्रेसचे राजीव सवर्णे, महिला अशासकीय प्रतिनिधी म्हणून रा.काँ.च्या उज्ज्वला नीळकंठ चौधरी, इतर मागासवर्गीय व भटक्या विमुक्त जाती व जमाती अशासकीय प्रतिनिधी म्हणून शिवसेनेचे शहरप्रमुख नितीन भगवान महाजन व काँग्रेसचे देवीदास हळपे, सर्वसाधारण प्रवर्ग अशासकीय प्रतिनिधी काँग्रेसचे इरफान शेख, अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून घनश्याम हरणकर, शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी म्हणून सचिन रमेश पाटील, सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी म्हणून शिवसेनेचे तालुकाप्रमुख योगीराज पाटील, ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधी म्हणून फिरोज सुभान तडवी, तर गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांची शासकीय प्रतिनिधी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नुकतेच आदेश पारीत केले आहेत.