तूर खरेदी बंद तरीही व्यापा:यांची वाहने बाजार समितीत
By admin | Published: May 29, 2017 12:56 AM2017-05-29T00:56:46+5:302017-05-29T00:56:46+5:30
जामनेर : खरेदी केंद्रावरील गोंधळ थांबेना; शेतकरी संतप्त, तीन वाहने पोलीस ठाण्यात
जामनेर : येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावरील सावळा गोंधळ थांबण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. खरेदी केंद्रावर रविवारी तूर आणू नये, असे आवाहन खुद्द सभापतींनी केल्यानंतरही आज सकाळी व्यापा:यांची तुरीने भरलेली तीन वाहने बाजार समितीच्या आवारात दिसल्याने शेतक:यांना संताप अनावर झाला. तहसीलदारांनी वाहने जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिल्यानंतर वातावरण निवळले.
वाढती आवक पाहता रविवारी तूर खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय झाल्यानंतरही सकाळी दुस:या गेटने व्यापा:यांची तीन वाहने आवारात आल्याचे पाहून शेतक:यांनी ही माहिती पत्रकार व शेतकरी संघाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांना दिली.
तहसीलदार नामदेव टिळेकर, बाविस्कर, डॉ. सुरेश पाटील यांनी तिघा वाहनांची पाहणी केली. तिन्ही वाहने व्यापा:यांची असल्याची खात्री झाल्यावर ती पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.
वाहनधारकांकडे टोकण, शेतकरी रांगेतच
जप्त करण्यात आलेल्या वाहनधारकांकडे असलेली तूर ही व्यापा:यांचीच असल्याचे त्यांच्याकडील सातबारा उता:यावरून स्पष्ट होत होते. मात्र त्यांच्याकडे बाजार समितीचे टोकण कसे आले, याचाही शोध घेतला जावा, अशी मागणी केली गेली. व्यापारी व बाजार समिती पदाधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताशिवाय हे अशक्य असल्याचे या वेळी शेतकरी उघडपणे बोलत होते. एकीकडे टोकणसाठी शेतकरी रांगेत उभा राहूनदेखील त्याला टोकण मिळत नाही, तर व्यापा:यांना सर्रासपणे टोकण देणारे कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. ‘व्यापा:यांचीच चलती, शेतकरी अडगळीत’ असे वृत्त रविवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची प्रचिती आजच्या प्रकाराने सर्वासमोर आल्याने शेतक:यांनी ‘लोकमत’चे कौतुक केले.
बाजार समितीचे पोलिसांना पत्र
दरम्यान, बाजार समितीच्या सचिवांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, रविवारी तूर खरेदी बंद असतानादेखील तुरीच्या गोण्या भरलेली तीन वाहने दुस:या गेटने आवारात आलेली पाहून शेतकरी संतप्त झाले.
कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तिन्ही वाहने जमा करीत आहोत. चौकशी करावी. या वाहनांमध्ये 127 गोणी तूर असल्याचे पत्रात म्हटले आहे.
शासकीय तूर खरेदी केंद्रावर मोजणी झालेल्या तुरीचा तपशील तपासून बाजार समितीच्या आवारात मोजणीअभावी पडून असलेल्या तुरीचे रेकॉर्ड मागविण्यात आले आहे. त्याची चौकशी केली जाईल.
- नामदेव टिळेकर,
तहसीलदार, जामनेर
तूर खरेदी केंद्र हे शेतक:यांसाठी असून, त्यांचा माल मोजण्याचा प्रामाणिक प्रय} आहे. मात्र, व्यापारी याचा गैरफायदा घेत असल्याने गोंधळ वाढत आहे. शेतक:यांनी व्यापा:यांना सहकार्य करू नये.
-चंद्रकांत बाविस्कर, चेअरमन, शेतकरी संघ, जामनेर