दसऱ्याला १०० कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 01:33 PM2018-10-20T13:33:20+5:302018-10-20T13:34:40+5:30
सुवर्ण खरेदीसाठी साधला मुहूर्त
जळगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसºयाच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसह वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. तसेच अनेकांनी नवीन घरात प्रवेश केला तर कापड बाजारातही मोठ्या प्रमाणात विक्री होऊन दिवाळीपूर्वीच दसºयाला सुमारे १०० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज विविध क्षेत्रातील जाणकारांनी वर्तविला.
सोने खरेदीसाठी प्रचंड उत्साह
जळगावातील सोने देशभरात प्रसिद्ध असल्याने येथे तशी नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते. पितृपक्षामुळे उलाढाल कमी झाली असताना सोने खरेदीत मंदीचे वातावरण होते. त्यानंतर नवरात्र व आता विजयादशमीला शहरातील सुवर्ण पेढी गजबजून गेल्या होत्या. शहरातील १५०च्या वर असलेल्या सुवर्ण पेढींमधून उलाढालीचा नक्की आकडा मिळाला नसला तरी कोट्यवधीची उलाढाल झाल्याचे जाणकारांनी सांगितले. एरव्ही नवरात्रात सुवर्ण बाजारात खरेदी वाढतेच. त्या प्रमाणे यंदाही गेल्या आठवड्यापासून सराफ बाजारात खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. या दिवसात भाव कितीही असले तरी ग्राहक सोन्याची खरेदी करतातच.
गेल्या आठवड्यापासून सोन्याचे दर ३२ हजाराच्यावर गेले आहे. तरीदेखील सुवर्ण बाजारात खरेदीचा उत्साह कायम होता. ऐन दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा मानस असलेल्या ग्राहकांचा मोठा उत्साह बाजारात दिसून आला.
८ कोटींच्या दुचाकींची विक्री
विजयदशमीचा मुहूर्त साधण्यासाठी नोकरवर्गाकडून दुचाकी व चारचाकीची खरेदीसाठी बुकिंग करण्यात आली होती. शहरातील दुचाकीच्या एकाच दालनात दसºयाच्या मुहूर्तावर ४७८ दुचाकींची विक्री झाली. या सोबतच इतर दालनांमध्ये मिळून साधारणत: ११०० दुचाकींची विक्री झाली. यातून साधारण ८ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.
३०० चारचाकींची विक्री
दुचाकीसोबतच चारचाकी वाहनांची विक्रीदेखील तेजीत राहिली. चारचाकीच्या एकाच शोरुमध्ये १७० तर शहरात एकूण ३०० चारचाकींची विक्री झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. यात १८ ते २० कोटींची उलाढाल झाली.
एलईडीला सर्वाधिक मागणी
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारालादेखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कधी नव्हे एवढ्या प्रमाणात एकाच दिवसात ७०० इलेक्टॉनिक्स वस्तूंची विक्री झाली. यात एलईडीला सर्वात जास्त मागणी होती. त्याखालोखाल फ्रीज, वॉशिंगमशीनची विक्री झाली. सकाळपासून ग्राहकांची खरेदी करण्यासाठी गर्दी सुरू झाली होती, अस ेविक्रेत्यांकडून सांगण्यात आले. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये ४ कोटींच्यावर उलाढाल झाली.
घर खरेदीतही ४० कोटींची उलाढाल
विजयादशमीच्या मुहूर्तावर जवळपास २५० जणांनी गृहप्रवेश केला. घर खरेदीसाठी गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ््या साईटची पाहणी केली जात होती. यासाठी कुटुंबासह अनेकजण येऊन शाळा, महाविद्यालय व इतर सोयींचा विचार करीत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. अनेकांनी आपापल्या सोयीनुसार व घराची किंमत पाहून नवीन घराची खरेदी केली. यातून जवळपास ४० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.
कापड बाजारतही उत्साह
सण-उत्सव म्हटले म्हणजे प्रत्येक जण नवीन कपडे खरेदीला पसंती देत असतो. त्यानुसार विजयादशमीलादेखील मोठ्या प्रमाणात नवीन कपड्यांची खरेदी होऊन जवळपास १० कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.
विजयादशमीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद राहिला. मुहूर्ताच्या दिवशी दुपारनंतर ग्राहकांची गर्दी वाढली होती.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.
घर खरेदीसाठी विविध योजनांमुळे उत्साह आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर घर खरेदीस चांगला प्रतिसाद राहिला.
- श्रीराम खटोड, बांधकाम व्यावसायिक
यंदा विजयादशमीला चारचाकी खरेदीसाठी मोठी उलाढाल झाली. एकाच दिवसात आमच्या दालनातून १७० चारचाकींची विक्री झाली.
- उज्ज्वला खर्चे, विक्री व्यवस्थापक.
दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. आमच्या दालनातून विजयादशमीला एकाच दिवसात ४७८ दुचाकींची विक्री झाली.
- अमित तिवारी, महाव्यवस्थापक.
यंदा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मोठी मागणी असल्याचे बाजारात चित्र आहे. एिकाच दिवसात शहरात जवळपास ७०० इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री झाल्याचा अंदाज आहे.
- दिनेश पाटील, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेते.