दाणाबाजारातील उलाढाल निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:01 PM2017-07-31T13:01:35+5:302017-07-31T13:03:46+5:30

‘जीएसटी’चा परिणाम : देशभरातून येणा:या मालाची आवक घटली; व्यापा:यांमध्ये चिंता

Turnover of is half | दाणाबाजारातील उलाढाल निम्म्यावर

दाणाबाजारातील उलाढाल निम्म्यावर

Next
ठळक मुद्देदेशासह विदेशातूनही आवकवर्दळ झाली कमी वाहतूकदार माल घेण्यास तयार नाही.

ऑनलाईन लोकमत / विजयकुमार सैतवाल

 

जळगाव, दि. 31 - 1500 जीवनावश्यक वस्तुंचा एकाच ठिकाणी व्यापार चालण्यासह अनेकांचे उदरनिर्वाहाचे केंद्र बनलेल्या दाणाबाजारावरही वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) परिणाम होऊन येथील व्यवहार मंदावल्याने उलाढाल निम्म्यावर आली आहे. जीएसटीच्या पूर्ततेत कंपनीकडूनही माल व बिल वेळेवर मिळत नसल्याने येथील आवकही घटली आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडूनही खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. 1 जुलैपासून जीएसटीची अंमबलबजावणी झाल्यानंतर त्याचे वेगवेगळे परिणाम दिसून येत आहे. अशाच प्रकारे एकाच ठिकाणी 200 दुकानांच्या माध्यमातून विविध जीवनावश्यक वस्तू होलसेल भावात उपलब्ध करून देणा:या जळगावातील दाणाबाजारावरही हा परिणाम दिसून येत आहे. राज्यासह शेजारील राज्यात पोहचतो माल दाणाबाजारातून खान्देश, मराठवाडा, विदर्भासह गुजरातच्या बारडोली, सुरत तसेच मध्य प्रदेशातील खंडवा, ब:हाणपूर या भागात माल जातो. मात्र जीएसटीमुळे या भागातील ग्राहक कमी झाले आहे. दाणाबाजारात मुंबई, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंद्रप्रदेश, ओडिसा, केरळ अशा देशातील विविध भागासह विदेशातूनही विविध मालाची आवक असते. मात्र जीएसटीमुळे या भागातून येणारा माल मंदावला आहे. बँकांचा व्यवहार सुरळीत दाणा बाजारात असलेल्या बँकांमध्ये या परिसरातील व्यापारी भरणा करीत असतात. तसे पाहता जून, जुलै महिन्यात व्यवसाय कमी असतो. त्यामुळे बँकांमध्येही भरणा कमी होत असतो. त्यातुलनेत बँकांमध्ये व्यवहार सुरळीत असल्याचे या परिसरातील बँकांच्यावतीने सांगण्यात आले. चार आठवडय़ानंरतही अडचणी कायम जीएसटीची अंमलबजावणी होण्यास चार आठवडे होत आले तरी अद्यापही यात येणा:या अडचणी कायम आहे. विशेषत: मोठय़ा कंपन्यांकडून बिलिंगची अडचण तर आहेच सोबत काही व्यापा:यांना नवीन पद्धत समजून घेण्यास अडचण येत असल्याने हादेखील परिणाम व्यवसायावर दिसून येत आहे. नोटाबंदीनंतर आता जीएसटीचा परिणाम केवळ धान्य, कडधान्य यांचेच नव्हे तर मीठापासून केशर्पयत अशा 1500 जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीविक्रीचे खान्देशातील प्रमुख केंद्र, अब्जावधीची उलाढाल होणारे आणि केंद्र व राज्य शासनाला कोटय़वधीचे उत्पन्न मिळवून देणारी भुसार व किराणा मालाची मोठी बाजारपेठ, असा लौकिक जळगावच्या दाणाबाजाराने मिळवला आहे. मात्र ही उलाढाल नोटाबंदीनंतर आता पुन्हा एकदा मंदावली आहे. सुमारे 1500 फूट लांब आणि 60 फूट रुंद मात्र वाहतूक वारंवार ठप्प होणा:या, पायी चालणे कठीण होणा:या या दाणाबाजाराची भव्यताही मोठी आहे. येथे एरव्ही पायी चालणे कठीण होते. मात्र सध्या याभागात फेरफटका मारला तर येथून आता वाहनही सहज काढता येत आहे, इतका परिणाम येथे दिसून येत आहे. जळगावातील दाणाबाजारावर अनेकांचा उदरनिर्वाह आहे. येथे आयात व निर्यात होणारा माल उतरविणे व पोहचविण्याचे मोठे काम करणा:या मजूर, हातगाडी चालकांवरही परिणाम झाला आहे. येथील उलाढाल मंदावल्याने मजूर हातावर हात धरून बसले आहे. जीएसटीमुळे कंपन्यांकडून अथवा मोठय़ा व्यापा:यांकडून बिल घेतल्याशिवाय वाहतूकदार माल घेण्यास तयार नाही. त्यामुळे दाणाबाजाराची आवकच मंदावली आहे. पूर्वी माल अगोदर आला तरी नंतर बिल पाठविले जात असत. मात्र आता वाहतूकदार जीएसटी क्रमांक असलेले बिल घेतल्याशिवाय माल आणण्यास तयार होत नाही. त्यामुळे आवकवरच परिणाम झाल्याने विक्री काय करावी, असा प्रश्न येथील व्यापा:यांपुढे उभा राहिला आहे.

 

जीएसटीमुळे मालाच्या आवकवर परिणाम झाला आहे. बिलाशिवाय वाहतूकदार माल आणत नाही. तसेच ग्रामीण भागातील ग्राहकही येत नसल्याने दाणाबाजारातील उलाढाल मंदावली आहे.

-प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणा बाजार असोसिएशन

Web Title: Turnover of is half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.