चाळीसगावला गुरांचा बाजार बंद झाल्याने लाखो रुपयांची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:13 AM2021-07-11T04:13:16+5:302021-07-11T04:13:16+5:30
चाळीसगाव : कोरोना संक्रमण पसरू नये, यासाठी प्रशासनाने नवीन निर्बंध जारी केले असून दि. ३ पासून शनिवारी भरणारा गुरांचा ...
चाळीसगाव : कोरोना संक्रमण पसरू नये, यासाठी प्रशासनाने नवीन निर्बंध जारी केले असून दि. ३ पासून शनिवारी भरणारा गुरांचा बाजारही बंद केला आहे. यामुळे दर शनिवारी गुरांच्या बाजारातून होणारी लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्र रुप धारण केल्यानंतर मध्यंतरी चार महिने गुरांच्या बाजारालाही टाळे लागले होते. शेतकरी व पशुपालकांच्या मोठ्या रेट्यामुळे बाजार सुरूही झाला होता. मात्र, वीकेंड लाॅकडाऊनचा निर्णय झाल्याने पुन्हा बाजारावर बंदची संक्रात कोसळली आहे.
चौकट
दर बाजारी होते ३५ लाखांची उलाढाल
चाळीसगावचा गुरांचा बाजारात खान्देशात प्रसिद्ध आहे. येथे दर शनिवारी गुरांच्या बाजारातून ३० ते ३५ लाखांची उलाढाल होते. बाजार बंद झाल्याने ही उलाढाल ठप्प झाली असून बाजार समितीच्या गंगाजळीत ३० ते ३५ हजार रुपये संकलित होतात. सद्यस्थितीत यालाही कात्री लागली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी
वीकेंड लॉकडाऊनमधून गुरांच्या बाजाराला विशेष सूट द्यावी. गुरांचा बाजार दर शनिवारी नेहमीप्रमाणे भरवावा, अशी मागणी पशुपालक व शेतकरी सातत्याने करीत आहेत.