कोरोना लसीकरणात जळगाव राज्यात बारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:14 AM2021-04-05T04:14:23+5:302021-04-05T04:14:23+5:30
आनंद सुरवाडे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू असून पहिला व दुसरा डोस मिळून ...
आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू असून पहिला व दुसरा डोस मिळून जळगावात एकूण १,६२, ६५५ इतके लसीकरण झाले आहे. लसीकरणात जळगाव जिल्हा राज्यात बाराव्या क्रमांकावर आला आहे. अन्य काही जिल्ह्यांच्या तुलनेत जळगावात लसीकरणाची गती समाधानकारक आहे. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आजपर्यंत सर्वाधिक लसीकरण झाले आहे.
जिल्ह्यात सुरूवातीला लसीच्या डोसच्या उपलब्धतेनुसार केंद्र ठरविण्यात आले होते. मात्र, पुरेशी लस उपलब्ध झाल्यानंतर केंद्र वाढविण्यात आले. आता सर्व आरोग्य केंद्रांसह विविध ठिकाणच्या खासगी रुग्णालयात लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. अनेक वेळा लसीचे पुरेसे डोस नसल्याने काही केंद्रांवर लसीकरण बंद ठेवावे लागले होते. आता चौथा टप्पा सुरू झाला आहे. यात राज्य शासनाकडून याची एकत्रित आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात शनिवारी सर्वाधिक १३ हजारांवर लसीकरण झाले.
ज्येष्ठ नागरिक आघाडीवर
लसीकरणाच्या पहिल्या डोसमध्ये सर्वाधिक लसीकरण हे ज्येष्ठ नागरिकांचे झाले आहे. महिनाभरात त्यांचा मोठा प्रतिसाद केंद्रांवर पाहायला मिळाला. अगदी १०२ वर्षांच्या आजी, ९७ वर्षाचे आजोबा यांनीही लस घेऊन कोरोनाशी लढा, आणि आम्ही तयार असल्याचा संदेश दिला. ७४ हजारावर ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. दरम्यान, ३७२ ज्येष्ठ नागरिकांनी दुसरा डोसही घेतला आहे.
असे झाले लसीकरण
आरोग्य कर्मचारी : पहिला डोस - २४२९१, दुसरा डोस - १००९१
फ्रंट लाईन वर्कर : पहिला डोस - २२३२२, दुसरा डोस - ६०४७
४५ - ६० वर्ष : पहिला डोस - २४९३३, दुसरा डोस - १५७
६० वर्षावरील : पहिला डोस ७४४३९, दुसरा डोस- ३७२
एकूण लसीकरण : १६२६५५
या केंद्रांवर पहिल्या डोसला मोठा प्रतिसाद
प्राथमिक आरोग्य केंद्र : ४६९०७
खासगी रुग्णालये : २१४८४
रेडक्रॉस रक्तपेढीचे केंद्र : ७६१५
जळगावच्या पुढे हे जिल्हे
मंंबई - १३३२८३४
पुणे - ९७४७२०
ठाणे - ५३५११७
नागपूर ४६७५२३
कोल्हापूर -४०७८७९
नाशिक -३१२४४५
अहमदनगर - २०३६१८
सातारा - १९८१३६
औरंगाबाद - १९०३९५
सांगली - १९२१९८
सोलापूर - १७८५६१