वडिलांचे निधन अन् मुलाने दिला बारावीचा पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 04:34 PM2020-03-02T16:34:55+5:302020-03-02T16:35:42+5:30

वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर दु:खद परिस्थितीतही दीपक सुरेश बोरसे या विद्यार्थ्याने २ रोजी बारावीचा जीवशास्त्र विषयाचा बोर्डाचा पेपर दिला.

Twelfth paper given by the father and death of his father | वडिलांचे निधन अन् मुलाने दिला बारावीचा पेपर

वडिलांचे निधन अन् मुलाने दिला बारावीचा पेपर

Next
ठळक मुद्देअंत्ययात्रा आटोपली मध्य प्रदेशातपरीक्षा केंद्रचालकांनी केले सांत्वन

चोपडा, जि.जळगाव : वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर दु:खद परिस्थितीतही दीपक सुरेश बोरसे या विद्यार्थ्याने २ रोजी बारावीचा जीवशास्त्र विषयाचा बोर्डाचा पेपर दिला.
पंकज विद्यालयातील बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी दीपक बोरसे याचे वडील सुरेश शांतीलाल बोरसे यांचे २ रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते मध्य प्रदेशातील वरला येथील शासकीय माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. डोक्यावर डोंगराएवढे दु:ख कोसळले असताना दीपकने हिंमत खचू न देता, बोर्डाचा पूर्व नियोजित जीवशास्र विषयाचा सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत पेपर दिला. हा पेपर त्याने महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर दिला.
या वेळी उपकेंद्रसंचालक व पर्यवेक्षक प्रा.व्ही.वाय. पाटील, प्रा.एस.पी.पाटील, प्रा.एन.बी.शिरसाठ यांनी या विद्यार्थ्यांचे सांत्वन केले.
मृत सुरेश बोरसे यांच्या पश्चात पत्नी संगीता बोरसे, मुलगी अर्चना बोरसे असा परिवार आहे.

Web Title: Twelfth paper given by the father and death of his father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.