जळगाव जिल्ह्यात आज वीस कोरोना बाधित रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 08:06 PM2020-05-19T20:06:44+5:302020-05-19T20:07:58+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या झाली 317
जळगाव - जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 45 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 25 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून वीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये धरणगावचे सात, भुसावळ येथील चार, चोपडा येथील एक, पळासखेडे, ता. जामनेर येथील एक, यावल तालुक्यातील दोन, गांधीचौक, सावदा येथील दोन तर जळगाव शहरातील पोलीस कॉलनीतील दोन व सिव्हील हॉस्पिटलमधील एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच यापूर्वीच कोरोना बाधित असलेल्या भुसावळ, अमळनेर व जळगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचे पुर्नतपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 317 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 110 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे तर आतापर्यंत 37 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.