जळगाव जिल्ह्यात चोवीस कोरोना बाधित रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 03:33 PM2020-05-29T15:33:05+5:302020-05-29T15:33:22+5:30

जळगाव -रावेर, सावदा, भुसावळ, जळगाव , फैजपूर, धरणगाव, चाळीसगाव, चोपडा येथील 196 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले ...

Twenty four corona infected patients were found in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात चोवीस कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात चोवीस कोरोना बाधित रुग्ण आढळले

googlenewsNext

जळगाव -रावेर, सावदा, भुसावळ, जळगाव, फैजपूर, धरणगाव, चाळीसगाव, चोपडा येथील 196 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 172 अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर 24 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये चोपडा, चाळीसगाव, फैजपूर, धरणगाव, शिरपूर, बोरकुल येथील प्रत्येकी एका व्यक्तींचा, जळगावातील आठ, भुसावळच्या चार, सावदा दोन, पावरा येथील चार रूग्णांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 595 इतकी झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Web Title: Twenty four corona infected patients were found in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.