तितूर नदीसाठी अडीच कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 05:27 PM2017-08-19T17:27:37+5:302017-08-19T17:28:59+5:30
स्वच्छतेसह पुनर्जीवन
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव: यंदाच्या उन्हाळ्यात तितूर व डोंगरी नदीची लोकसहभाग व नाम फाऊंडेशनच्या प्रय}ातून स्वच्छता करण्यात आली असून आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नाने तितूर नदी पुनर्जीवनासाठी अडीच कोटीचा निधी मंजूर झाला आहे.
आमदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नदी पुनर्जीवन मोहीमेला सुरुवात झाली. याचं अनुषंगाने जलयुक्त शिवार अभियानातर्ंगत त्यांनी निधी मिळविण्यासाठी प्रय} सुरु केले होते. मृद व जलसंधारण मत्रालयाकडे त्यांनी सिमेंट बंधारे बांधण्याचा प्रस्ताव दाखलही केला होता. मत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 16 मार्च रोजी झालेल्या बैठकीत तितूर पुनर्जीवनासाठी अडीच कोटीचा निधी मंजुर करण्यात आला असून 11 सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहे. तितूरच्या पुनजीर्वानामुळे सिंचनाची पातळी वाढणार असून काही गावांना पिण्याच्या पाण्याचा लाभही होईल. गेल्या अनेक वर्षात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याची प्रतिक्रिया आ. उन्मेष पाटील यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली.