दोघ फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Published: January 23, 2017 12:08 AM2017-01-23T00:08:28+5:302017-01-23T00:08:28+5:30
पारोळा : सिनेस्टाईल पाठलाग करून मध्यरात्री घेतले ताब्यात, आरोपींकडून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
पारोळा :येथील बसस्थानकाजवळ दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणा:यांपैकी फरार झालेल्या दोघ आरोपींना पारोळा पोलिसांनी जळगाव येथे पाठलाग करून पकडले. 24 तासाच्या आत आरोपींना पकडल्याने, नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
पारोळा येथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तीन जण फिरत होते. पोलीस कॉन्स्टेबल सुनील साळुंखे, व राकेश पाटील यांनी या तिघांना हटकले. त्यांची विचारपूस केली असता, ते उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागले. तिघांना ताब्यात घेण्याचा प्रय} केला असता, त्यापैकी एकजण घटनास्थळावरून फरार झाला. उर्वरित दोघांना ताब्यात घेतले. यात विकास चंद्रकांत साळुंखे (22, रा.कंडारी, ता.भुसावळ) याच्या ताब्यातून देशी बनावटीचा गावठीकट्टा आढळून आला.
विकासला भेटण्यासाठी शनिवारी सायंकाळी सहा वाजेपासून त्याचे दोन मित्र पोलीस स्टेशनच्या आवारात फिरत होते. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी त्यांना विकासला भेटू दिले नाही. परंतु या भेटण्यास आलेल्या दोघांच्या संपर्कात फरार झालेले आरोपी असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांना मिळाली. या दोघ मित्रांवरही लक्ष ठेवण्यास पोलीस कॉन्स्टेबल सुनील साळुंखे व राकेश पाटील यांना सूचना देण्यात आली.
आरोपी मित्राला न भेटता आल्याने, ते दोघेही रात्री 11 वाजता परतले. उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, कॉन्स्टेबल सुनील साळुंखे, राकेश पाटील, राहूल चौधरी यांच्या पथकाने एका खाजगी वाहनाद्वारे त्या दोघांच्या मोटारसायकलीचा पाठलाग केला.ते दोघेजण महामार्गावर गिरणा नदीच्या पुलाजवळील डाव्या बाजुला असलेल्या एका कॉलनीत थांबले होते. त्याठिकाणी फरार झालेला आरोपी अतुल पाटील आला. मात्र त्याला पोलीस आपल्या मार्गावर असल्याचा सुगावा लागला. तो घटनास्थळावरून पळून जात असतांना त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी त्यास पकडले. त्याला खाकीचा हिसका दाखविला. तिसरा फरार आरोपी योगेश मालचे हा कुठे आहे, याची चौकशी केली. तेव्हा तो फरार आरोपी देखील याच कॉलनीत एका वकीलाकडे अटकेत असलेल्या विकासच्या जामीनासाठी गेला असल्याचे सांगितले.आरोपी योगेश मालचे याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रात्री 1 वाजेच्या सुमारास त्या वकीलाच्या घरार्पयत गेले. तेथे योगेश उभा असल्याचे दिसताच, त्यालाही ताब्यात घेण्यात आले.पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास दोन्ही आरोपींना पारोळा पोलीस स्टेशनमध्ये आणले. (वार्ताहर)
दरम्यान पकडण्यात आलेल्या आरोपींना सायंकाळी न्यायाधीश आनंद भडके यांच्यासमोर हजर केले असता, त्यांना 27 जानेवारीर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.
4दरोडय़ाच्या उद्देशाने पारोळा बसस्थानकावर रात्रीच्यावेळी संशयितरित्या फिरणारे तीघही आरोपींना पोलिसांनी अटक केलेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्यांची टोळी असल्याचीही माहिती मिळू शकते.