भडगाव येथे अडीच लाखांचे टायर लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 04:43 PM2021-01-27T16:43:14+5:302021-01-27T16:44:00+5:30

भडगाव येथे मास्टर लाईन या टायर गोडाऊनचेअंदाजे अडीच लाख रुपये किमतीचे दुचाकीचे १९४ टायर लांबविले.

Two and a half lakh tire lamps at Bhadgaon | भडगाव येथे अडीच लाखांचे टायर लंपास

भडगाव येथे अडीच लाखांचे टायर लंपास

Next
ठळक मुद्देआरोपींचा शोध सुरू, श्वानपथकासह ठसेतज्ज्ञांना पाचारण

लोकमत न्यूज नेटवर्क

कजगाव ता. भडगाव : भडगाव येथील मास्टर लाईन या टायर गोडाऊनचे चॅनल गेट व आतील दरवाजा उघडून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे अडीच लाख रुपये किमतीचे दुचाकीचे १९४ टायर लांबविले. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

भडगाव : पाचोरा रस्त्यालगत एमआयडीसी भागात असलेले मास्टर लाईन हे टायर गोडाऊन २३ रोजी सायंकाळी बंद केले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी रविवारी सुटी असल्याने गोडाऊनला कोणी आलेच नाही. २५ रोजी गोडाऊनला कार्यरत असलेले कर्मचारी व ऑफिसर हे ड्युटीवर आल्यानंतर गोडाऊन फोडल्याचे लक्षात येताच ही घटना मालक समीर जैन यांना कळविण्यात आली.त्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, फौजदार पठारे यांनी भेट देऊन पाहणी केली असता या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलचे १९४ टायर चोरून नेल्याचे दिसून आले. ही घटना २३ अथवा २४ च्या रात्रीची असू शकते. चोरट्यांनी गोडाऊनच्या चॅनल गेटचे कुलूप व आतील दरवाजाचे कुलूप तोडत आत प्रवेश केला. चोरीसाठी चारचाकी वाहन वापरण्यात आले असून याचे वाहन वीज वितरण कंपनीच्या बाजूला असलेल्या झुडपाजवळ अंदाजे दोनशे ते अडीचशे मीटर अंतरावर पार्क केले होते.

एवढ्या अंतरापर्यंत या चोरट्यांनी तब्बल १९४ टायर वाहून नेले. अंदाजे अडीच लाखांचे टायर या चोरट्यांनी लांबविले. गोडाऊन ते चोरीसाठी वापरलेले वाहन यादरम्यानचे अंतर अंदाजे अडीचशे मीटर असल्याने चोरट्याची संख्यादेखील जास्त असू शकते. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. घटनास्थळी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते. श्वान परिसरात घुटमळत राहिला. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two and a half lakh tire lamps at Bhadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.