धूमस्टाईल मोबाईल लांबविणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:18 AM2021-09-11T04:18:06+5:302021-09-11T04:18:06+5:30
अक्षय जावळे - ११ सीटीआर १३ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील पांडे चौक व रिंगरोड परिसरातून ...
अक्षय जावळे - ११ सीटीआर १३
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील पांडे चौक व रिंगरोड परिसरातून पायी जाणाऱ्या व्यक्तींच्या हातातून धूमस्टाईलने मोबाईल हिसकाविणाऱ्या तिघांपैकी दोघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. अक्षय उर्फ मॉडेल मुकेश अटवाल आणि अक्षय आनंदा जावरे (रा. गुरूनानक नगर, शनीपेठ) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे असून, त्यांच्याकडून दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून धूमस्टाईलने मोबाईल हिसकावल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी या टोळींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आले होते. दरम्यान, शनिपेठेतील मुकेश अटवाल आणि अक्षय जावरे या दोघांकडे चोरीचे मोबाईल असल्याची माहिती पथकाला मिळाली. शुक्रवारी पथकाने शनिपेठेत जाऊन दोघांचा शोध घेतला. त्यानंतर त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशीअंती दोघांनी रोहित उर्फ रोहन पंडित निदाने याच्या मदतीने पांडे चौक व रिंगरोड परिसरातून पायी चालणाऱ्या व्यक्तींच्या हातातून मोबाईल हिसकावून चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोन मोबाईल त्यांनी पोलिसांना काढून दिले. दोघांना पुढील कारवाईसाठी जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई सहाय्यक फौजदार विजय पाटील, युनूस शेख, जयंत चौधरी, संदीप साळवे, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, अविनाश देवरे, पंकज शिंदे, मुरलीधर बारी आदींनी केली आहे.